Connect with us

महाराष्ट्र

बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार

Mahabatmi

Published

on

बुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Advertisement

महाराष्ट्र

जालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार

Avatar

Published

on

By

औरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.

अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.

Continue Reading

महाराष्ट्र

जैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस

Mahabatmi

Published

on

Amruta Fadnavis joins election campaign and Mahavir Jayanti Program in Mulund

जैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.

जैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.

Continue Reading

महाराष्ट्र

सबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प

Mahabatmi

Published

on

Loksabha Electon 2019

तलासरी | पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंघाने महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र गावीत यांचे प्रचार्थ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार मा. श्री. पास्कल धनारे आमदार यांच्या नेतृत्वाखाली तलासरी सुतारपाडाया ठिकाणी करण्यात आले होते. या मेळाव्यास महायुतीचे पालघर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना, आरपीआय, श्रमजीवी व आगरी सेना आदी पक्ष व संघटनांचे *हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.* या मेळाव्यात श्री. रवींद्र चव्हाण, श्री रवींद्र पाठक,भरत राजपूत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित व राजेश शहा, श्रीनिवास वनगा व महायुतीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी हजर होते.

महायुतीचे मा. राजेंद्र गावीत यांना  सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या व महायुतीच्या कार्य पुरतीसाठी स्थानिक पातळीवर ज्या प्रमाणे कर्तव्य पक्ष निष्ठतेने निवडणूक लढवली जाते त्या प्रमाणे गावीतांना निवडणून आणण्याचा संकल्प यावेळीमहायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

 

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in