Connect with us

महाराष्ट्र

रामदास कदम नव्हे हे तर दामदास कदम

Mahabatmi

Published

on

Dhananjay Munde criticized against Shiv Sena Leader Ramdas Kadam

खेड | ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले , त्या शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले ? शिवसेनेचा केंद्रात उद्योग मंत्री असताना कोकणात एकही प्रकल्प आला नाही. राज्यात त्यांच्याच उद्योग मंत्री असतांना त्यांचे काय उद्योग सुरू आहे तर फक्त भूसंपादनातून शेतक-यांची अडवणूक आणि लूट सुरू असल्याचा घणाघाती हल्ला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी खेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
निवडणुकांच्या तोंडावर या सरकारला वाटतंय की जीएसटीत बदल करावा, दहा टक्के आरक्षण द्यावं. मोदींनी एवढा अभ्यास केला तरी कधी? असा सवाल केला.

२०१४ मध्ये ५० रूपयाला मिळणाऱ्या पेट्रॉलने ८० रूपयांचा टप्पा पार केला. तुम्हीच हिशोब लावा. गॅसचे भाव 2014 ला किती होते आणि आता केव्हढयाला मिळतो याचा विचार करा मग सरकारकडून झालेली लूट लक्षात येईल असे म्हणत महागाईच्या मुद्दाकडे लक्ष वेधले.

आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. असं ऐकलंय की, शिवसेनेच्या मंत्र्याचे सुपूत्र निवडणूकीला उभे राहतायत. ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो असे म्हणत मंत्री रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव , आमदार संजय कदम, सौ. चित्राताई वाघ, आ. प्रकाश गजभिये, आ. विद्याताई चव्हाण, अजिंक्य राणा आदी उपस्थित होते.

Advertisement

महाराष्ट्र

टँकर आणि क्रूझरचच्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू

Mahabatmi

Published

on

बेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात गाडीतील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व मृत तरूण कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरचे रहिवासी आहेत. होळी साजरी करण्यासाठी हे सर्वजण गोव्याला गेले होते. होळी साजरी करून ते गोव्याहून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

क्रझरचा चालक गाडी अतिवेगाने चालवत होता, शिवाय त्याला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

वैशाली येडे यांना बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर

Mahabatmi

Published

on

मुंबई : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक वैशाली येडे यांना आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली. वैशाली या यवतमाळ-वाशिम येथून लढणार असून राजकारणातील घराणेशाहीला तोडण्यासाठी आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी वैशाली यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

वैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत. त्या शेतकरयांच्या विशेषत: त्यांच्या जीवनावर आधारित नाटक ‘तेरव’मध्ये जनाबार्इंची भूमिका साकारतात. वादग्रस्त ठरलेल्या ९२व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचा मान वैशाली यांना मिळाला होता.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटन म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यीकाच्या हस्ते का? असा प्रश्न राजकीय पक्षांनी उपस्थित केला. त्यांचे आमंत्रण रद्द केल्यानंतर वैशाली येडे यांना नवीन उद्घाटक म्हणून मान देण्यात आला. वैशाली यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना २ मुले आहेत. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत.

Continue Reading

महाराष्ट्र

मधल्या सुट्टीत विद्यार्थी वाचताहेत इंग्रजी कथांची पुस्तकं!

Mahabatmi

Published

on

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी शाळेची मधली सुट्टी म्हणजे एकमेकांचा डबा खाणं आणि धांगडधिंगा-मस्ती! पण सायन येथील डी.एस.हायस्कुलमधील मुलं याला अपवाद ठरली आहेत. मधल्या सुट्टीच्या अर्ध्या तासात ही मुलं देश-विदेशातल्या गोष्टींची इंग्रजी पुस्तकं वाचण्यासाठी धडपडतात. याचं श्रेय जातं शाळेत चालवल्या जाणाऱ्या ‘स्पोकन इंग्रजी’च्या उपक्रमाला.मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेत गेल्या चार वर्षांपासून स्पोकन इंग्रजीचा विशेष वर्ग नियमितपणे राबवला जातोय. शाळेने त्यासाठी पाच तज्ञ शिक्षकांची नेमणूकच केली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचं बोली इंग्रजी सुधारावे, यासाठी हे शिक्षक नवनवे प्रयोग करत असतात.

२०१८ च्या सप्टेंबर महिन्यात शाळेच्या विश्वास्ताच्या सहकार्याने स्पोकन इंग्रजीच्या खोलीत ३५० पुस्तकांची एक लहानशी लायब्ररी बनवण्यात आली. या लायब्ररीत लहान मुलांना आवडतील आणि समजतील अशी इंग्रजी भाषेतील गोष्टींची तसंच चित्रकथांची पुस्तकं, कॉमिक्स कथा यांचा समावेश आहे. मुलांनी मधल्या सुट्टीत किंवा वेळ मिळेल तेव्हा ही पुस्तकं वाचायला यावं असं आवाहन करण्यात आलं, आणि म्हणता म्हणता विद्यार्थ्याचा इतका प्रतिसाद लाभू लागला की, स्पोकन इंग्रजीचा वर्गच त्यासाठी कमी पडू लागला.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.