Connect with us

महाराष्ट्र

भारतरत्न पद्मश्री आचरेकरांचा सरकारला विसर! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही

Mahabatmi

Published

on

मुंबई – मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक महान क्रिकेटपटूंना घडवणारा द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांचं मुंबईत निधन झालं. क्रिकेट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या लाडक्या आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनला अश्रू अनावर झाले.

रमाकांत आचरेकर यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना घडवले आहे. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला दिग्गज मंडळी आणि चाहत्यांची गर्दी आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेकांचा समावेश होता.

द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित रमाकांत आचरेकर यांना केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तरीही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेले नाही. याच माणसाने भारतरत्न सचिन तेंडुलकर घडवला आहे. त्यामुळे, आचरेकरांच्या कारकीर्दीचा सरकारला विसर पडला की काय अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटली आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisement

महाराष्ट्र

मधल्या सुट्टीत विद्यार्थी वाचताहेत इंग्रजी कथांची पुस्तकं!

Mahabatmi

Published

on

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी शाळेची मधली सुट्टी म्हणजे एकमेकांचा डबा खाणं आणि धांगडधिंगा-मस्ती! पण सायन येथील डी.एस.हायस्कुलमधील मुलं याला अपवाद ठरली आहेत. मधल्या सुट्टीच्या अर्ध्या तासात ही मुलं देश-विदेशातल्या गोष्टींची इंग्रजी पुस्तकं वाचण्यासाठी धडपडतात. याचं श्रेय जातं शाळेत चालवल्या जाणाऱ्या ‘स्पोकन इंग्रजी’च्या उपक्रमाला.मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेत गेल्या चार वर्षांपासून स्पोकन इंग्रजीचा विशेष वर्ग नियमितपणे राबवला जातोय. शाळेने त्यासाठी पाच तज्ञ शिक्षकांची नेमणूकच केली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचं बोली इंग्रजी सुधारावे, यासाठी हे शिक्षक नवनवे प्रयोग करत असतात.

२०१८ च्या सप्टेंबर महिन्यात शाळेच्या विश्वास्ताच्या सहकार्याने स्पोकन इंग्रजीच्या खोलीत ३५० पुस्तकांची एक लहानशी लायब्ररी बनवण्यात आली. या लायब्ररीत लहान मुलांना आवडतील आणि समजतील अशी इंग्रजी भाषेतील गोष्टींची तसंच चित्रकथांची पुस्तकं, कॉमिक्स कथा यांचा समावेश आहे. मुलांनी मधल्या सुट्टीत किंवा वेळ मिळेल तेव्हा ही पुस्तकं वाचायला यावं असं आवाहन करण्यात आलं, आणि म्हणता म्हणता विद्यार्थ्याचा इतका प्रतिसाद लाभू लागला की, स्पोकन इंग्रजीचा वर्गच त्यासाठी कमी पडू लागला.

Continue Reading

महाराष्ट्र

खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका

Mahabatmi

Published

on

अकोला- अकोल्याचे भाजपचे विद्यमान खासदार संजय शामराव धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अकोल्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून धोत्रे यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र, भाजपकडून धोत्रे यांचे तिकीट कापण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ते तणावात आहे. या तणावातून त्यांना शुक्रवारी (ता.15) हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

सुप्रिया सुळे बारामतीतून तर उदयनराजे भोसलेंना साता-यातून उमेदवारी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

Mahabatmi

Published

on

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांच्यासह इतर नावे जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.

आज पार्थ पवार यांचं नाव मात्र जाहीर करण्यात आलं नाही. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्याचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू असं त्यांनी म्हटलं आहे तो निर्णय आमच्या मनाप्रमाणे जाहीर करू द्या असं जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

१) सुप्रिया सुळे-बारामती
२) सुनील तटकरे-रायगड
३) उदयनराजे भोसले-सातारा
४) आनंद परांजपे- ठाणे
५) बाबाजी पाटील-कल्याण
६) धनंजय महाडीक-कोल्हापूर
७) मोहम्मद फैजल-लक्षद्विप
८) संजय दीना पाटील-ईशान्य मुंबई
९) राजेंद्र शिंगणे-बुलडाणा
१०) गुलाबराव देवकर-जळगाव
११) राजेश विटेकर-परभणी

हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता राष्ट्रवादीची इतर उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात जाहीर होणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. मुंबईतील धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.