Connect with us

महाराष्ट्र

बीडच्या रिंगणात प्रीतम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित ?

Mahabatmi

Published

on

amarsingh-pandit-against-pritam-munde

मुंबई | संपूर्ण महाराष्ट्र लक्षवेधी ठरणा-या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांचा सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंडे यांच्या नावावर बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केले तर मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अमरसिंह पंडित यांच्या नावाला जवळपास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. जागा वाटपासाठी राजकीय पक्षांनी बैठका आणि चर्चांवर भर दिला आहे. काल शुक्रवार (ता.४) रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीत लोकसभा उमेदवाराची चाचपणी करण्यात आली. त्यात बीड, रायगड, कोल्हापुर, परभणी, सातारा, उस्मानाबाद आणि जळगाव या ठिकाणी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

बीड लोकसभेसाठी आ. अमरसिंह पंडीत आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर या दोन नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. काही दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांना बीड लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्हयातील स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. मात्र लोकसभेसाठी जयदत्त क्षीरसागर खा डॉ. प्रीतम मुंडेंच्या विरोधात लढण्यास इच्छूक नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आ. अमरसिंह पंडीत यांचे नाव रिंगणात राहिले, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी प्रहार वेब टीमशी बोलताना दिली.

क्षीरसागरांतही भाऊबंदकी

जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघासाठी जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी द्यावी, आणि विधानसभा मतदारसंघात संदीप यांना उमेदवारी देऊन त्यांच्यातील वाद मिटवावा, यासाठी राष्ट्रवादीतील नेते प्रयत्नशील आहेत. मात्र काका पुतण्याचा वाद मिटण्याची काही शक्यता दिसत नाही.

Advertisement

महाराष्ट्र

नर्मदा नदीत बोट बुडाली, सहा जणांचा मुत्यू

Mahabatmi

Published

on

नंदुरबार- मकर संक्रांतीच्या पुजेसाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट धडगाव तालुक्यात नर्मदा नदीत बुडाली. प्राथमिक माहितीनुसार, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला, एक पुरूष व एका बालकाचा समावेश. 40 जणांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचाव पथकाचे शोध कार्य सुरू केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोटमध्ये क्षमतपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोल ले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच तेलखेडीच्या (ता.धडगाव) गावकरी मदतीला धावून आले. अत्यावस्थ नागरिकांना तातडीने धडगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. सर्व लोक तेलखेडी येथील असल्याचे समजते. मकर संक्रांती निमित्त भाविक नर्मदा नदीची पूजा करण्यासाठी गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तीन तरंग रूग्णावहिका व आठ 108 पोहोचल्या असून शोधकार्य सुरु आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

कोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, एकाचा मृत्यू , सहा जण जखमी

Mahabatmi

Published

on

कोपरगाव- शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात एक जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.इंदिरा नगर भागातील मावळ ग्रुप चौकात पहिला स्फोट झाला. त्यात सहा जण जखमी झाले. गांधी नगरातील आचारी हॉस्पिटल चौकात दुसऱ्या स्फोटात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. जुबेर रशीद शेख (वय-45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

स्फोटांच्या घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पालिपा प्रशासनाने शहरातील गॅस फुगे विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

रामदास आठवले यांच्या सभेत राडा

Mahabatmi

Published

on

औरंगाबाद- विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सभेत रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ‘चोर’ म्हटले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत खुर्च्यांची फेकाफेक करत गोंधळ घातला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात सोमवारी रात्री ९ वाजता सभा सुरू झाली. प्रकाश आंबेडकरांकडे मोर्चा वळवत शेळके म्हणाले, ‘शैक्षणिक इमारती उभ्या कराव्यात म्हणून बाबासाहेबांनी येथे जमीन विकत घेऊन ठेवली. पण आंबेडकरांचे नातू ती जमीन विकत आहेत. ते चोर आहेत.’ हे ऐकताच कार्यकर्त्यांनी ‘बाबासाहेबांचा विजय असो, बाळासाहेबांचा विजय असो’ अशा घोषणा देत खुर्च्यांची फेकाफेक केली. शेळके यांनी ‘मला कोणावरही टीका करायची नाही,’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नंतर आठवले यांनी भाषणात ‘माझ्या पदाधिकाऱ्याने कोणाबद्दलही असे बोलणे मला पसंत नाही, आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे,’ असे स्पष्ट केले. गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलिस बंदोबस्त वाढवला. तरीही सभा संपेपर्यंत घोषणाबाजी सुरूच होती.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.