Connect with us

महाराष्ट्र

शेतकरी कंगाल सरकारी कर्मचारी मालामाल

Mahabatmi

Published

on

7th-pay-commission

औरंगाबाद | राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने त्यांच्या पगारात श्रेणीनिहाय ४ ते १४ हजारांची वाढ होणार आहे. या उलट मागील चार वर्षांत शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नात मात्र सरासरी केवळ ६२६ रुपये वाढ झाली आहे. नाबार्डच्या आर्थिक समावेशकताविषयक सर्वेक्षणातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची ही वाढ समोर आली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सर्वेक्षणानुसार, देशातील शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात गेल्या चार वर्षांत २५०५ रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ८३९१ रुपये आहे. चार वर्षांपूर्वी ते ६४२६ रुपये होते. या हिशेबाने दर वर्षाला सरासरी ६२६.२५ रुपयांनी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढते आहे. देशातील ४३ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी असून त्यांच्यावर सरासरी ९१,८५२ रुपये कर्ज आहे. महाराष्ट्रात ३५ टक्क्यांहून जास्त शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी असल्याचे समोर आले आहे.

  1. देशातील २९ राज्यांच्या २४५ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण घेण्यात आले.
  • तेलंगणात सर्वाधिक शेतकरी कुटुंबांवर कर्ज 
    देशात ८ ते ९ राज्यांतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांवर कर्जाचा डोंगर आहे. तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात हे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील सरासरी ४३ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी आहेत.
  • प्रमुख राज्ये : कर्ज असणारी शेतकरी कुटुंबे 
    तेलंगण : ७९ टक्के
    आंध्र प्रदेश : ७६ टक्के
    कर्नाटक : ७५ टक्के
    अरुणाचल प्रदेश : ६९ टक्के
    मणिपूर : ६२ टक्के
    तामिळनाडू : ६१ टक्के
    ओडिशा : ५४ टक्के
    उत्तराखंड : ५० टक्के
    बिहार : ४८ टक्के
    पंजाब : ४४ टक्के
    मध्य प्रदेश : ४३ टक्के
    महाराष्ट्र : ३५ टक्के
    गुजरात : २७ टक्के
  • १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनवाढ : 
    चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मासिक ४ ते ५ हजार वाढ तृतीय श्रेणीच्या वेतनात ५ ते ८ हजार वाढ द्वितीय-प्रथम श्रेणी अधिकारी, ९ ते १४ हजारांपर्यंत वाढ.
  1. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २३ टक्क्यांपर्यंत वाढ 
    जानेवारीपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग लागू करण्याची घोषणा नुकतीच देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती. यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या हाती वाढीव वेतनाचे लाभ पडणार अाहेत. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी व सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार.
Advertisement

महाराष्ट्र

नर्मदा नदीत बोट बुडाली, सहा जणांचा मुत्यू

Mahabatmi

Published

on

नंदुरबार- मकर संक्रांतीच्या पुजेसाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट धडगाव तालुक्यात नर्मदा नदीत बुडाली. प्राथमिक माहितीनुसार, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला, एक पुरूष व एका बालकाचा समावेश. 40 जणांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचाव पथकाचे शोध कार्य सुरू केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोटमध्ये क्षमतपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोल ले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच तेलखेडीच्या (ता.धडगाव) गावकरी मदतीला धावून आले. अत्यावस्थ नागरिकांना तातडीने धडगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. सर्व लोक तेलखेडी येथील असल्याचे समजते. मकर संक्रांती निमित्त भाविक नर्मदा नदीची पूजा करण्यासाठी गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तीन तरंग रूग्णावहिका व आठ 108 पोहोचल्या असून शोधकार्य सुरु आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

कोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, एकाचा मृत्यू , सहा जण जखमी

Mahabatmi

Published

on

कोपरगाव- शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात एक जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.इंदिरा नगर भागातील मावळ ग्रुप चौकात पहिला स्फोट झाला. त्यात सहा जण जखमी झाले. गांधी नगरातील आचारी हॉस्पिटल चौकात दुसऱ्या स्फोटात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. जुबेर रशीद शेख (वय-45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

स्फोटांच्या घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पालिपा प्रशासनाने शहरातील गॅस फुगे विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

रामदास आठवले यांच्या सभेत राडा

Mahabatmi

Published

on

औरंगाबाद- विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सभेत रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ‘चोर’ म्हटले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत खुर्च्यांची फेकाफेक करत गोंधळ घातला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात सोमवारी रात्री ९ वाजता सभा सुरू झाली. प्रकाश आंबेडकरांकडे मोर्चा वळवत शेळके म्हणाले, ‘शैक्षणिक इमारती उभ्या कराव्यात म्हणून बाबासाहेबांनी येथे जमीन विकत घेऊन ठेवली. पण आंबेडकरांचे नातू ती जमीन विकत आहेत. ते चोर आहेत.’ हे ऐकताच कार्यकर्त्यांनी ‘बाबासाहेबांचा विजय असो, बाळासाहेबांचा विजय असो’ अशा घोषणा देत खुर्च्यांची फेकाफेक केली. शेळके यांनी ‘मला कोणावरही टीका करायची नाही,’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नंतर आठवले यांनी भाषणात ‘माझ्या पदाधिकाऱ्याने कोणाबद्दलही असे बोलणे मला पसंत नाही, आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे,’ असे स्पष्ट केले. गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलिस बंदोबस्त वाढवला. तरीही सभा संपेपर्यंत घोषणाबाजी सुरूच होती.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.