उल्हासनगर(गौतम वाघ):- उल्हासनगर शहरातील इंदिरा गांधी भाजी मार्केट धोकादायक झाल्याने उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी मार्केट तोडण्यास गेले असता ,भाजी विक्रेते आणि मनसे कामगार नेते दिलीप थोरात यांनी विरोध करत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना परत पाठवले, महानगरपालिका हे मार्केट तोडून भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणत असून,सर्व प्रथम या भाजी विक्रेत्यांना एक मार्केट उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मनसे कामगार नेते दिलीप थोरात यांनी यावेळी केली,महानगरपालिका मार्केट तोडून हा भूखंड धन दांडग्यांनच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप थोरात यांनी यावेळी केला.विरोधी पक्षाच्या भुमिकेत नेहमी अग्रणी असणारी किंबहूना आक्रमकतेचा परिचय देणारी मनसे ही जिव्हाळ्याच्या विषयाला हात घालत असल्याचे स्पष्ट झाले असून सत्ताधारी हात धरून बसल्याची खंत भाजीविक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.