मुंबईः शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस कुठलेही बंधन नसताना मुंबई महापालिकेचे अधिकारी शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाच मागत असल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शेतकऱ्यांनी शेतीमाल मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल घेऊन बोरीवली किंवा वाशीच्या मार्केटमध्ये येतात. येथे बिहारी किंवा उत्तर प्रदेशमधील विक्रेत्यांना भाजीपाला विक्रीसाठी महापालिका परवानगी देते. परंतु स्थानिक किंवा महाराष्ट्रीय विक्रेत्यांकडून प्रत्येक एक हजारांची लाच मागते. याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आपला कृषीमाल मंत्रालाच्या प्रवेशद्वारावर फेकून दिला. या प्रकाराने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी उभे असलेल्या पोलिसांची त्रेधा तिरपट उडाली. नेमके काय झाले, याचा शोध घेण्याता पोलिसांचीही धावपळ उडाली. सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.