नंदुरबार- अक्कलकुवा, धडगाव तालुक्यासह मध्यप्रदेशमधील बडवणी पानसमेल परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला सातपुडयात परिसरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ब्राम्हणपुरी येथील सुसरी नदीला पूर आला आहे. भर उन्हाळ्यात नदीला पूर आल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
 शहरासह जिल्हाभरात तापमान चाळीशीच्यावर गेले आहे. अशात वातावरणात बदल होऊन सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दर्‍याखोर्‍यांसह काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला व सुसरी नदीला अचानक पूर आला. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.