पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पंढरपूर शहर विकास आघाडी, पंढरपूर शहर भाजपा व रूक्मिणी पटांगण तरूण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या वेळी उमेश परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले,माजी उपनगराध्यक्षा महाजन नगरसेविका शकूताई नडगिरे व सुप्रियाताई डांगे, भाजपाचे बादलसिंह ठाकूर, बाबाराव महाजन उपस्थित होते. सामाजिक समरसता वाढावी व घटनाकार माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या यथोचित सन्मान होण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे पाटील यांनी सांगितले.