रत्नागिरी-रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्प होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत यासाठी सामंजस्य करार केला आहे. दरम्यान, या प्रकल्पाला नाणार परिसरातील १६ गावांतील नागरिकांनी विरोध दर्शविलेला कोकणेचे नेते नारायण राणे यांनी विरोध दर्शवला आहे. यापूर्वी शिवसेनेने देखील प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. परंतु या परिसरात शिवसेना नेत्यांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. आता या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने राणेंसह शिवसेनेची गोची झाली आहे. दरम्यान, या प्रश्नी नारायण राणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. तर माजी खासदार नितेश राणे यांनी हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.