Connect with us

विदेश

दोन बहिणींमध्ये लागले भांडण, वडिलांसोबत कोण आधी बेड शेअर करणार!

Mahabatmi

Published

on

न्यूयॉर्क – अमेरिकेत एका सख्ख्या बाप आणि मुलीला अनैतिक संबंधांसाठी तरुंगात डांबण्यात आले आहे. या दोघांनाही प्रत्येकी 8-8 वर्षांची शिक्षा होणार आहे. अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतात घडलेल्या घटनेत कौटुंबिक वाद समोर आला आहे. कौटुंबिक वादातूनच बाप लेकींचे अनैतिक संबंध जुळले असे पोलिसांनी सांगितले. आरोपी बाप दोन  मुलींसोबत एकाच घरात राहत होता. त्या दोघींमध्ये आपल्या वडिलांना जास्त जवळ कोण करेल अशी स्पर्धा लागली होती. त्या दोघींच्या मनात एकमेकींबद्दल ईष्या निर्माण झाली होती. यातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

ट्रॅव्हिस फील्डग्रोव (39) ने दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला तसेच तिच्याकडून जन्मलेल्या एका मुलीसोबत हॅस्टिंग्स येथे राहत होता. 4 वर्षांपूर्वी फील्डग्रोवला अचानक त्याच्या पहिल्या पत्नीने फोन केला आणि दोघांच्या संबंधांतून एक मुलगी सॅमन्था असल्याचे सांगितले. ती मुलगी 17 वर्षांची झाली होती. यानंतर फील्डग्रोवने आपल्या पहिल्या पत्नीकडून ती मुलगी घरात आणली आणि दोन्ही मुलींसोबत राहायला सुरुवात केली.

आपले वडील घरात नव्याने आलेली सावत्र बहीण सॅमन्थाला जास्त वेळ देत असल्याची भावना पहिल्या मुलीच्या मनात निर्माण झाली. कालांतराने दोघींच्या मनात एकमेकींबद्दल ईर्ष्या वाढत गेली. या रागात त्यांनी बहीण-बहीण आणि बाप-लेकीच्या नात्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. आपल्या वडिलांना कोण जास्त जवळ करेल अशी स्पर्धाच सुरू केली. ही स्पर्धा इतक्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचली की आता वडिलांसोबत बेड शेअर कोण करणार याची पैजच लागली. याच ईष्येपोटी सॅमन्था आणि फील्डग्रोव यांच्यात अनैतिक संबंध जुळले.पहिल्या बहिणीला आपल्या सावत्र बहीण आणि वडिलांमध्ये संबंधांचा सुगावा लागला. तिने बदला घेण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, बाप-लेकीला आपल्या संबंधांची चौकशी होणार अशी माहिती मिळाली तेव्हा दोघांनी कायद्यातून पळवाट शोधली आणि नाव बदलून एकमेकांसोबत विवाहच केला. तपास अधिकाऱ्यांना विवाहाची कागदपत्रे दाखवली आणि आपण पती-पत्नी आहोत असा सोंग रचला. परंतु, पहिल्या पत्नीचा जबाब आणि डीएनए चाचणीतून सत्य समोर आले. या दोघांवर आई आणि बहीण अशा दोघींनी वेग-वेगळ्या प्रांतांमध्ये अनैतिक संबंधांचा खटला दाखल केला. अमेरिकेच्या कायद्यानुसार, रक्ताच्या नात्यांमध्ये संबंध बनवणे गुन्हा आहे. हे दोघेही दोषी ठरले असून त्यांना कोर्टाकडून किमान 8 वर्षांची शिक्षा सुनावली जाणार आहे.

Advertisement

देश

एका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का? अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा

Mahabatmi

Published

on

मुंबई. सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटचे फोटोज व्हायरल होत आहे. हुबेहूब अनुष्का शर्मा सारखी दिसणारी ही मुलगी प्रसिध्द अमेरिकन सिंगर जूलिया माइकल आहे. जूलियाने स्वतः स्विकारले की, ती अनुष्का शर्मासारखी दिसते. ज्यूलिया माइकलने सोशल मीडियावर लिहिले की, “हाय अनुष्का शर्मा, खरंतर आपण जुळ्या आहोत.” यावर अनुष्काने रिप्लाय केला होता की, “ओह माय गॉड, मी तुला आणि उरलेल्या 5 लोकांना शोधत होते.” अनुष्काने रिप्लाय दिल्यानंतर जूलियाने रिप्लाय केला होता की, “हा हा हा… आपण एक दिवसासाठी एकमेकांची जागा घ्यायची का?” या ट्वीटवरुन जूलियाने जाहिर केले की, तिला एक दिवस तिचा पती विराट कोहलीची मिसेस बनायचे आहे. म्हणजे तिने डायरेक्ट अनुष्काला एक दिवस तिचा पती विराट मागितला. यूलियाच्या या ट्वीटवर अनुष्का-विराटने काहीच रिप्लाय दिलेला नाही. पण सोशल मीडियावर कपलचे चाहते तिला उत्तर देत हेत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “डायरेक्ट म्हण ना की, तुला एक दिवसासाठी विराट कोहली हवा आहे…”. दूस-या यूजरने लिहिले, “लोक मिसेस कोहली बनण्यासाठी इच्छुक असतात आणि हिला पाहा.” एक यूजर म्हणाला, “तिचा पही कोहली आहे. हार्दिक पांड्या नाही.” अजून एका यूजरने लिहिले की, “विराटला हे आवडणार नाही तो फक्त अनुष्कावर प्रेम करतो.” पण विराट कोहलीला डायरेक्ट प्रपोज करण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये इंग्लंड क्रिकेट टीमच्या ऑनराउंडर डेनियल व्याटनेही विराटला सोशल मीडियावर प्रपोज केले आहे. डेनियलने ट्विटरवर लिहिले होते की, “कोहली मॅरी मी” या ट्वीटनंतर डेनियल खुप चर्चेत आली होती. तर जूलिया माइकल गाणेही लिहिलेते आणि तिला ग्रॅमी अवार्ड्सच्या दोन कॅटेगिरीमध्ये नॉमिनेटही करण्यात आलेले आहे.

Continue Reading

क्राईम

26/11 हल्ला प्रकरणी पाकिस्तानच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

Mahabatmi

Published

on

मुंबई – मुंबईतील सत्र न्यायालयाने पाकिस्तानी लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच प्रकरणात पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आणि लश्कर ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्याने अमेरिकेतील न्यायालयात पाकिस्तानी संरक्षण दलातील मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इकबाल यांची नावे घेतली आहे. त्यांनी मुंबई हल्ल्याचा कट रचला होता असे त्याने सांगितले. त्यानंतरच मुंबई सत्र न्यायालयाने दोघांच्या विरोधात वॉरंट जारी केला आहे.

ISI मध्ये तैनात आहे मेजर इकबाल
कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, मेजर पाशा पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाला आहे. तर मेजर इकबाल सध्या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मेजर पाशा आणि मेजर इकबाल यांचा आपल्या चार्जशीटमध्ये वॉन्टेड असा उल्लेख केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एसव्ही यारलगाद्दा यांनी 21 जानेवारी रोजी आलेले अपील सुनावणीसाठी स्वीकारले होते. कोर्ट सध्या लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सय्यद झैबुद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल प्रकरणाची सुनावणी करत आहे. जुंदालची या हल्ल्यात सक्रीय भूमिका होती असा आरोप आहे.

Continue Reading

देश

ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या

Published

on

By

मुंबई- सन 2014 मध्ये भारतात झालेली लोकसभा निवडणूक फिक्स होती. कारण तेव्हा ईव्हीएम हॅकिंग झाले होते. विशेष म्हणजे ईव्हीएम हॅकिंगबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती, म्हणूनच त्याची दिल्लीत हत्या करण्यात आली, असा खळबळजनक गौप्यस्फोट एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने केला आहे. सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव आहे. आपल्याकडे हॅकिंग कसे झाले, याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो, असा दावाही शुजा याने केला आहे.

सय्यद शुजा याने लंडनमध्ये लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहे. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा याने सहभाग घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीतही EVM हॅक होऊ शकतात, असा दावाही त्याने केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.