Connect with us

विदेश

लहानपणापासूनच भाऊ करायचा अश्लील चाळे

Mahabatmi

Published

on

लंडन – ब्रिटनच्या लिंकनशायर येथे एका तरुणीने आपली आपबिती मांडली आहे. ती फक्त 3 वर्षांची होती तेव्हापासून तिच्या नरकयातना सुरू झाल्या. इतक्या लहान वयात आपल्यासोबत काय घडते याची तिला जाणीवही नव्हती. 12 वर्षांची झाली तेव्हा तिने आपल्या भावाच्या बळजबरीला विरोध केला. परंतु, आई-वडिलांना सांगण्याचे धाडस करू शकली नाही. आरोपी तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. तब्बल 10 वर्षे भावाचा अत्याचार सहन केल्यानंतर तिने अखेर आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. तसेच दोघींनी मिळून आरोपीला तुरुंगात पाठवले. लाज किंवा संकोच या गोष्टींमुळे आपल्यासारख्या कित्येक मुली शांत राहतात. त्यांनाच धाडस देण्यासाठी आपण ही कहाणी शेअर करत आहोत असे मायलेकींनी सांगितले आहे.

तरुणीने सांगितल्याप्रमाणे, तिला कळतही नव्हते तेव्हापासून खेळता-खेळता तिचा भाऊ तिच्यासोबत अश्लील वर्तन करायचे. मोठी होत असताना त्याचे हे अश्लील चाळे वाढत गेले. ती 12 वर्षांची होती तेव्हा तिला आपल्यासोबत काहीतरी वाइट घडत आहे असे कळाले. भाऊ तिच्याजवळ आला तेव्हा तिने त्याचा तीव्र विरोध केला. परंतु, मोठे असल्याचा गैरफायदा घेत त्याने दमदाटी केली आणि अत्याचार सुरूच ठेवले. त्याचवेळी तिने आपल्या आईला यासंदर्भात तक्रार केली असती तर अत्याचार तेव्हाच थांबला असता. परंतु, भाऊ मोठा असल्याने त्याची भीती म्हणा की आईला ही गोष्ट नक्की सांगायची तरी कशी या लाजेपोटी ती शांत होती. हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली आणि तिचे अख्खे लहानपण उद्ध्वस्थ झाले.

ती 18 वर्षांची झाली तेव्हा तिने आरोपीला धडा शिकवण्याचा ठाम निर्णय घेतला आणि आईला संपूर्ण गोष्ट सांगितली. आपल्या चिमुकलीवर अत्याचार होतोय ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण, आरोपी आपलाच मुलगा आणि तिचा सख्खा भाऊ असल्याचे कळाले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. आई सांगते, आपल्या मुलाच्या अमानवीय कृत्यांसाठी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात तिने थोडासाही संकोच केला नाही. तिने आपल्या मुलीसोबत जाऊन थेट पोलिस स्टेशन गाठले आणि दोघींनी या अत्याचाराची तक्रार दाखल केली. कोर्टाने 2014 मध्ये आरोपीला दोषी ठरवून 9 वर्षांची कैद सुनावली. तसेच तो सध्या तुरुंगातच आहे.

Advertisement

क्राईम

कराचीत गँग्सटर फारुकची गोळ्या झाडून हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई – भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी दाऊदचा आणखी एक जवळिक छोटा शकीलने फारुकची हत्या केली असे वृत्त आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच दुबईमध्ये फारुकला अटक केली होती. परंतु, दुबईतून भारतात आणण्यात यश आले नाही. यानंतर आता त्याचा पाकिस्तानात खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Continue Reading

देश

‘आयएसआय’चा हनी ट्रॅप; 45 भारतीय जवान फसले

Mahabatmi

Published

on

जोधपूर- पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने जैसलमेर लष्करी तळावर सोमवीरसिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. इतकेच नव्हे तर या हनी ट्रॅपमध्ये तब्बल ४५ जवान अडकले असल्याचे चौकशीतून समोर आले. जवानांकडून माहिती काढून घेण्यासाठी ती व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत नृत्य करत होती. हे जवान महत्त्वाच्या विभागांत व लष्करी तळांवर तैनात होते. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून अटक केली.

या महिलेने ‘अनिका चोप्रा’ नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून भारतीय जवानांशी मैत्री वाढवली. यात हे जवान अडकत गेले. सोमवीर २०१६ मध्ये अनिकाच्या जाळ्यात अडकला. यानंतर फेसबुकवरील फ्रेंड लिस्टमधील इतर जवानांशी मैत्री वाढवली. त्यामुळे या सर्व जवानांची कसून चौकशी सुरू आहे. राजस्थान सीआयडीसह जोधपूरच्या यंत्रणाही ही चौकशी करत आहेत. आतापर्यंत नेमकी कोणती माहिती बाहेर गेली हे आता स्पष्ट झाले नाही.

Continue Reading

विदेश

पोलिस अधिकाऱ्याची पत्नीच निघाली कॉलगर्ल

Mahabatmi

Published

on

लंडन – इंग्लंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पत्रकाराने हायप्रोफाईल कॉलगर्ल्स आणि हॉटेलांमध्ये चालणाऱ्या देहविक्रयाचा भांडाफोड केला. त्यामध्येच एका महिलेला अटकही करण्यात आली. परंतु, ती महिला चक्क एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. विशेष म्हणजे, आपल्या वयाच्या तिशीत असलेली ही विवाहिता गेल्या 10 वर्षांपासून एक कॉलगर्ल म्हणून देहविक्रय करत होती. परंतु, तिच्या पोलिस अधिकारी पतीला याचा काहीच पत्ता नव्हता. स्टिंग ऑपरेशनमध्ये खुलासा झाला नसता तर तिचे सत्य कधीच पती आणि जगासमोर आले नसते.

लंडनच्या पोलिस विभागात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याची पत्नी स्टिंग ऑपरेशनमध्ये देहविक्रय करताना पकडली गेली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नाव आणि कुटुंबाची माहिती घेतली. तेव्हा त्यांना ती आपल्याच विभागातील बड्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे कळाले. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी पोलिस स्टेशनला अटक करून आणली आणि तिच्यावर देहविक्रयाचे आरोपही लागले. पण, आपल्या वरिष्ठाला आणि तिच्या पतीला ही गोष्ट सांगावी तरी कशी असा प्रश्न त्यांना पडला होता. तिला कॉलगर्ल होण्याचे कारण विचारले तेव्हा दुसरा धक्का बसला. आपण पैसे कमविण्यासाठी हे काम करत नाही, तर केवळ मौज मजेसाठी करत आहोत अशी कबुली तिने दिली. एवढेच नव्हे, तर आपल्या कामाबद्दल पश्चाताप नसल्याचेही तिने सांगितले.

हीच माहिती जेव्हा पोलिसांनी तिच्या पतीला दिली तेव्हा पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. आपण ज्या सुंदर आणि सुशील महिलेसोबत पती म्हणून राहतोय तिची प्रत्येक मागणी पूर्ण करतोय ती कॉलगर्ल निघेल याचा त्याने विचारही केला नव्हता. पीडित पतीने आपल्या पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. सोबतच, पोलिसांना तिच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.