Connect with us

विदेश

निरव मोदीला अटक

Mahabatmi

Published

on

लंडन। पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडन पोलिसांनी अटक केली. वेस्टमिन्स्टर न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने जामीन फेटाळून २९ मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावली. दरम्यान, नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणावर २९ मार्चपासून सुनावणी सुरू होईल. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी पुढील आठवड्यात लंडनला रवाना होऊ शकतात. मनी लाँडरिंग प्रकरणात नीरवच्या प्रत्यार्पणासाठी ईडीने भूमिका मांडल्यानंतर १३ मार्चला कोर्टाने वॉरंट काढले होते. मंगळवारी रात्री अटक झाल्यावर बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान प्रत्यार्पणाच्या मागणीवर दोन आठवड्यांत सुनावणी व्हावी, अशी मागणी भारत सरकारने केली.

Advertisement

देश

अमेरिकेच्या महिला अधिकाऱ्याचे एमपीच्या शेतकऱ्याशी लग्न

Mahabatmi

Published

on

होशंगाबाद – मध्य प्रदेशातील सिवनी माळव्याच्या बिसोनी गावातील शेतकरी दीपक (३६) राजपूत याची अमेरिकेच्या जेलिका लिजेथशी (४०) फेसबुकवर झालेली मैत्री होळीच्या दिवशी विवाहात बदलली. जेलिका लिजेथ अमेरिकेच्या मनुष्यबळ विभागात (एचआरडी) अधिकारी आहे. ती दोन महिन्यांपूर्वी भारतात आली होती. यादरम्यान दोघांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. होळीच्या दिवशी त्यांनी नर्मदेच्या तीरावरील चित्रगुप्त मंदिरात लग्नगाठ बांधली. नंतर या नवपरिणीत जोडप्याने एकमेकांना रंगही लावला.

जेलिका लिजेथ म्हणाली की, तिला भारतीय संस्कृतीनुसार लग्न करायचे होते. यासाठी होशंगाबादमध्ये येऊन लग्न केले. तत्पूर्वी, उभयतांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. दीपक म्हणाला की, त्याने बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तो भारतीय लष्करात तंत्रज्ञही राहिलेला आहे.जेली अमेरिकेच्या टॉस बोलव्हिया शहराची रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिची फेसबुकवरून दीपकशी मैत्री झाली होती. यानंतर दोघांत नियमितपणे व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग होऊ लागली. नंतर फोनवरही बोलणे होऊ लागले. मैत्री प्रेमात बदलली. दीपकने लग्नाची इच्छा व्यक्त केली व जेलीने होकार दिला. दोघांचेही कुटुंबीय लग्नामुळे आनंदी असल्याचे दीपक म्हणाला.

Continue Reading

विदेश

न्यूझीलंडमध्ये मशीदीत गोळीबारात ९ ठार

Mahabatmi

Published

on

न्यूझीलंड : बांग्लादेशचा संघ क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आला होता. बांग्लादेशचा संघ ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत शुक्रवारच्या नमाजसाठी थांबला होता. त्यावेळी एक अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला. यावेळी नमाजसाठी आलेले ९ जण ठार झाले. मात्र, बांग्लादेश संघाला संघातील सर्व खेळाडूंना सुरक्षित मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले.

दरम्यान लिनवूड येथील मशीदीतही काही हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात ९ जण ठार झाले आहेत. ३० जण जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटकही केली आहे. या हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि इतर ज्वलनशील उपकरणे जप्त करण्यात आली आहेत

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी आजचा दिवस न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं जाहीर केले आहे. हिंसेला न्यूझीलंडच्या भूमीवर थारा नाही अशा शब्दात त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे

Continue Reading

विदेश

चीनने 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला वैश्विक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवते

Mahabatmi

Published

on

न्यूयॉर्क – पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेला जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला १० वर्षांत चौथ्यांदा पुन्हा एकदा चीनने वाचवले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावावर चीनने व्हेटो वापरला. बुधवारी जर्मनीनेही असाच प्रस्ताव मांडला होता. मात्र, मसूदला दहशतवादी घोषित करण्यापूर्वी एक तास चीनने तांत्रिक कारण पुढे करत आडकाठी आणली. पुराव्याशिवाय कारवाईस आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले. तीन दिवसांपूर्वीही चीनने हीच भूमिका मांडली होती. यावर सद्सद््विवेकबुद्धीने निर्णय घ्या, असा सल्ला अमेरिकेने दिला होता. भारत-पाकदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी मसूदला दहशतवादी घोषित करणे आवश्यक अाहे, असेही अमेरिकेने सुनावले होते.

२६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईदलाही संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केले होते. मात्र, आज तो पाकमध्ये असून जाहीरपणे सभा घेतो, नवे अतिरेकी घडवतो. मात्र, हाफिजची जमात-उद-दावा ही संघटना जगाच्या नजरेत येऊ नये म्हणून जाहीरपणे हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.

 

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in