Connect with us

मनोरंजन

#Metoo सलमान खानवर सेक्सुअल हॅरेसमेंट प्रकरणी गुन्हा दाखल

Mahabatmi

Published

on

मुंबई- ‘डान्स इंडिया डान्स’चा विजेता आणि कोरियोग्राफर सलमान युसूफ खानवर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सलमानविरोधात‍ गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. तक्रारदार महिला एक डान्सर आहे. एका शोमध्ये सलमानने पीडित मॉडेलला बोलावले होते. घरी सोडताना कारमध्ये तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे मॉडेलने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्रकरण ऑगस्ट 2018 मधील आहे. सलमान खानने तिला एका इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी ओशिवारामधील कॅफेटेरियामध्ये बोलावले होते. दुबईतील बॉलीवूड पार्कमध्ये परफॉर्म करण्यासाठी त्याला अनेक महिला डान्सरची आवश्यकता असल्याचे सलमाने पीडितेला सांगितले होते. घरी सोडून देण्याच्या नावाखाली त्याने कारमध्ये बसवले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.

पीडितेने सलमानवर आणखी एक आरोप केला आहे. तो म्हणजे सलमानने तिचा पासपोर्ट हिसकावून घेतला आहे. तसेच पीडितेने दुबईला येण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे मजबूरीत दुबई तसेच बहरीनमध्ये त्याच्यासोबत परफॉर्म करावा लागला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

Advertisement

देश

एका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का? अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा

Mahabatmi

Published

on

मुंबई. सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटचे फोटोज व्हायरल होत आहे. हुबेहूब अनुष्का शर्मा सारखी दिसणारी ही मुलगी प्रसिध्द अमेरिकन सिंगर जूलिया माइकल आहे. जूलियाने स्वतः स्विकारले की, ती अनुष्का शर्मासारखी दिसते. ज्यूलिया माइकलने सोशल मीडियावर लिहिले की, “हाय अनुष्का शर्मा, खरंतर आपण जुळ्या आहोत.” यावर अनुष्काने रिप्लाय केला होता की, “ओह माय गॉड, मी तुला आणि उरलेल्या 5 लोकांना शोधत होते.” अनुष्काने रिप्लाय दिल्यानंतर जूलियाने रिप्लाय केला होता की, “हा हा हा… आपण एक दिवसासाठी एकमेकांची जागा घ्यायची का?” या ट्वीटवरुन जूलियाने जाहिर केले की, तिला एक दिवस तिचा पती विराट कोहलीची मिसेस बनायचे आहे. म्हणजे तिने डायरेक्ट अनुष्काला एक दिवस तिचा पती विराट मागितला. यूलियाच्या या ट्वीटवर अनुष्का-विराटने काहीच रिप्लाय दिलेला नाही. पण सोशल मीडियावर कपलचे चाहते तिला उत्तर देत हेत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “डायरेक्ट म्हण ना की, तुला एक दिवसासाठी विराट कोहली हवा आहे…”. दूस-या यूजरने लिहिले, “लोक मिसेस कोहली बनण्यासाठी इच्छुक असतात आणि हिला पाहा.” एक यूजर म्हणाला, “तिचा पही कोहली आहे. हार्दिक पांड्या नाही.” अजून एका यूजरने लिहिले की, “विराटला हे आवडणार नाही तो फक्त अनुष्कावर प्रेम करतो.” पण विराट कोहलीला डायरेक्ट प्रपोज करण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये इंग्लंड क्रिकेट टीमच्या ऑनराउंडर डेनियल व्याटनेही विराटला सोशल मीडियावर प्रपोज केले आहे. डेनियलने ट्विटरवर लिहिले होते की, “कोहली मॅरी मी” या ट्वीटनंतर डेनियल खुप चर्चेत आली होती. तर जूलिया माइकल गाणेही लिहिलेते आणि तिला ग्रॅमी अवार्ड्सच्या दोन कॅटेगिरीमध्ये नॉमिनेटही करण्यात आलेले आहे.

Continue Reading

मनोरंजन

भाभीजी’ काँग्रेस मे है.. शिल्पा शिंदे आज सायंकाळी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

Mahabatmi

Published

on

मुंबई – बिग बॉस या प्रसिद्ध रियालिटी शोची विजेती आणि भाभीजी घर पर है.. मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शिंदे आज सायंकाळी संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

1999 पासून दूरदर्शन वाहिनीवरुन शिल्पाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती अनेक टीव्ही सिरियल्समध्ये दिसली. ‘भाभीजी घर पर है’ या सीरियलमधून तिला विशेष ओळख मिळाली. मात्र नंतर काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली. पण नंतर बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली आणि पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर गेली

Continue Reading

मनोरंजन

अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

Mahabatmi

Published

on

मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांना कर्करोग झाला होता. त्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे शेवटचे दिवस काम करायचं या इराद्याने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले होते. नुकत्याच आलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरुनच त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फुले हे त्यांचं नाटक तर प्रचंड गाजलं होतं. तसंच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत.

1977 मध्ये “चांदोबा चांदोबा भागलास का” या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

मात्र कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय दामिनी, बंदिनी, युगंधरा या कार्यक्रमांतही ते दिसले. ते नुकतेच माझे पती सौभाग्यवती या मालिकेतही झळकले होते.

रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार स्नेहल वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना हर्षवर्धन नावाचा एक मुलगा आहे. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1949 रोजी झाला होता. त्यांना आणखी दोन भावंडं असून त्यांचं बालपण मुंबईत गेलं. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. तसंच खो-खो या खेळातही ते पारंगत होते.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.