Connect with us

मनोरंजन

आलिया कतरिनासारखी चूक करणार नाही!

Mahabatmi

Published

on

Karan Johar Dedicates This Song to Rumoured Couple Alia Bhatt, Ranbir Kapoor

मुंबई | बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे. आलिया – रणबीरसोबत अनेक आऊटिंग करताना दिसत आहे. आलिया आपल्या या नात्याबद्दल अधिक सिरियस असून तिने लाँग लाईफ करताना अनेक प्लान्स केले आहेत.

तसेच आलियाचं असं म्हणणं आहे की, तिला रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफप्रमाणे रिलेशनशिपमध्ये चूक करायची नाही. त्यामुळे आलिया आता खूप अलर्ट आहे.

डेक्कन क्रॉनिकलमध्ये छापून आलेल्या माहितीनुसार, आलियाने सर्वाधिक वेळ रणबीरसोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ती काहीही करायला तयार आहे.

असाच काहीसा हाल कतरिनाचा देखील झाला होता जेव्हा ती रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. कतरिनाने आपल्या करिअरमुळे रिलेशनशिपला खूप लांब ठेवलं होतं.
पण ही चूक आलियाला करायची नाही. कारण आजही कतरिनाला आपल्या या निर्णयामुळे पश्चाताप होत आहे. आजही कतरिना एकटी आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि आलियाचे वडिल महेश भट्ट यांनी द टेलीग्राफ यांना एक महत्वाची गोष्ट शेअर केली होती. ते म्हणाले की, हो या दोघांमध्ये प्रेम आहे. पण त्यामध्ये कन्फर्म करण्यासारखं काहीच नाही.

तर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कतरिनाने सांगितलं की, ब्रेकअपनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. आता ती अधिकवेळ स्वतःला देते आणि स्वतःचा विचार करते. आयुष्य अधिक चांगल करायला मला पु्न्हा एकदा वेळ मिळाला आहे. तिचं ब्रेकअप होणं हे कोणत्याच वरदानापेक्षा कमी नाही.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूरचं नातं हे सहा वर्ष सुरू होतं. पण अचानक या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कतरिना गेल्या दोन वर्षांपासून एकटीच असून रणबीर कपूर आता आलियाला डेट करत आहे. .

Advertisement

मनोरंजन

#PM NarendraModi यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Mahabatmi

Published

on

बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचं कुतूहल अनेकांना होतं. त्यातूनच विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची खिल्लीही उडवण्यात आली होती. मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असं म्हणत अनेकांनी कौतुक केलं आहे.

Continue Reading

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

Published

on

By

नवी दिल्ली – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात आज पहाटे नव्या वर्षाची सुरुवात या वाईट बातमीने झाली आहे.

कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान कादर खान यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कॅनडात अंत्य संस्कार करायचे की, भारतात आणून अंत्यसंस्कार करायचे याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.