Connect with us

मनोरंजन

भाभीजी’ काँग्रेस मे है.. शिल्पा शिंदे आज सायंकाळी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

Mahabatmi

Published

on

मुंबई – बिग बॉस या प्रसिद्ध रियालिटी शोची विजेती आणि भाभीजी घर पर है.. मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शिंदे आज सायंकाळी संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

1999 पासून दूरदर्शन वाहिनीवरुन शिल्पाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती अनेक टीव्ही सिरियल्समध्ये दिसली. ‘भाभीजी घर पर है’ या सीरियलमधून तिला विशेष ओळख मिळाली. मात्र नंतर काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली. पण नंतर बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली आणि पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर गेली

Advertisement

मनोरंजन

शितलीचा पाण्यासाठी लढा

Mahabatmi

Published

on

नाशिक : मार्च संपता संपता उन्हाळ्याचे तीव्र चटके जाणवू लागल्याने आता पाण्यासाठीही वणवण सुरु झाली आहे. उन्हासोबतच पाण्याचे दुर्भिक्ष ही एक मोठी समस्या अनेक ठिकाणी भेडसावते आहे. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित ‘H2O कहाणी थेंबाची’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असे म्हटले जाते, की तिसरे महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल. पण, जर आपल्याला भविष्यात होणारी ही भीषण स्थिती थांबवायची असेल तर आतापासूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. असा काहीसा सकारात्मक संदेश देणा-या ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटामधून शीतल अहिरराव पाण्यासाठी लढा आणि पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणार आहे.

‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’, ‘हंगामा’, ‘दिवाणा तुझा’ या म्युझिक अल्बम्समधून शिवाय ‘जलसा’, ‘मोल यांसारख्या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेला चेहरा म्हणजेच शीतल अहिरराव. शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांची मने जिंकणारी शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटात समाजप्रबोधन करताना दिसेल. शिवाय ‘व्हीआयपी गाढव’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’ आणि ‘सलमान सोसायटी’ हे शीतलचे आगामी चित्रपट असून लवकरच या ही चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

पर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभी राहणार आहे. अशाच एक गंभीर विषयावर भाष्य करणारा मौलिक मराठी चित्रपट म्हणजे जी. एस. प्रोडक्शन प्रस्तुत सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दिग्दर्शित ‘H2O कहाणी थेंबाची’ १२ एप्रिलपासून आपल्या भेटीस येणार आहे.

मूळची नाशिकची शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ चित्रपटाविषयी बोलताना सांगते, ‘H2O’ चित्रपटाची स्क्रिप्ट अतिशय उत्तमरीत्या मांडली होती. स्क्रिप्ट वाचताच माझ्या अंगावर शहारेच उमटले. आपण जर पर्यावरणाचा असाच -हास करीत राहिलो तर भविष्यकाळ बिकट असल्याचे मला जाणवलं. मी क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटाच्यानिमित्ताने माझ्या हातून समाजप्रबोधन घडेल जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला उमगल्या खूप काही शिकायला मिळाले. या प्रवासात मला खूप छान अनुभव घेता आले. या अनुभवाची ठेव आयुष्यभर माझं जगणं समृध्द करणारी आहे.

‘H2O’ चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार आहे. शीतलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास विविधतेने नटलेला असून शीतल आपल्या कामाविषयी प्रचंड जागरूक आहे. एक कलाकार म्हणून आपणही समाजाचे काही ना काही देणं लागतो ह्याची तिला पुरेपूर जाण असल्यामुळे तिने ‘H2O’ सारखा गंभीर विषय निवडला. तिच्या प्रयत्नांना रसिकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल ह्यात काही शंका नाही.

Continue Reading

मनोरंजन

भाजपाविरोधात मतदान करण्याचा सिने कलाकरांचा आवाहन

Mahabatmi

Published

on

मुंबई: देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन  केलंय. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलंय. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास 111 लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

भाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणं आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.

Continue Reading

मनोरंजन

प्रियांका चोप्रा पतीसोबत रोमँटिक मूडमध्ये

Mahabatmi

Published

on

प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनससोबत मियामीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनवर प्रियांकासोबत तिचे जेठ-जाऊ, जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्यासोबतच दोन्ही दीरदेखील आहेत. प्रियंकाने आपल्या इंस्टाग्रामवर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज शेयर केले आहेत. या फोटोजमध्ये प्रियांका ब्लॅक बिकिनीमध्ये 10 वर्षे लहान पती निकसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली.

प्रियांकाने शेयर केलेल्या एका फोटोमध्ये ती होणारी जाऊ सोफी टर्नरसोबत मोटर बोटची रेस लावतानाही दिसली. प्रियांकाचे तिच्या जावेसोबत चांगले नाते आहे. दोघी बऱ्याचदा सोबत टाइम स्पेंड करताना दिसतात आणि एकमेकींचे फोटोजही सोशल मीडियावर शेयर करतात. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच फिल्म ‘द स्काय इज पिंक’ ने बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या फिल्ममध्ये ती फरहान अख्तरसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. सोनाली बोसच्या डायरेक्शनमध्ये बनणारी ही फिल्म याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in