Connect with us

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

Avatar

Published

on

नवी दिल्ली – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात आज पहाटे नव्या वर्षाची सुरुवात या वाईट बातमीने झाली आहे.

कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान कादर खान यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कॅनडात अंत्य संस्कार करायचे की, भारतात आणून अंत्यसंस्कार करायचे याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

मनोरंजन

महिला दिनानिमित्त सोनालीचा संदेश

Mahabatmi

Published

on

मुंबई : जागतिक महिला दिनाचा उत्साह सर्वत्र साजरा होत असताना अभिनेत्री सोनाली बेंद्रेने खास संदेश दिला आहे. सोनालीला गेल्या वर्षी हायग्रेड कॅन्सरचे निदान झाले. यानंतर ती अमेरिकेत उपचारासाठी गेली. भारतात परतल्यानंतर सोनालीने पहिल्यांदाच फोटोशूट केले आहे. ट्विटर अकाऊंटद्वारे सोनालीने तिचा फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये शस्त्रक्रीयेची खूण दिसत आहे. ‘स्वत:ला आहात तसे स्विकारा, Find your new normal’ असा संदेश सोनालीने या फोटोसह दिला आहे.

https://twitter.com/iamsonalibendre/status/1103231426994925568
Continue Reading

मनोरंजन

किंग खानने विंग कंमाडर अभिनंदनचं केलं स्वागत

Mahabatmi

Published

on

#WelcomeBackAbhinandan: विंग कमांडर अभिनंदन भारतात परतला आहे. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांकडे अभिनंदन यांना सोपवलं. वाघा बॉर्डरवर अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावर देखील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानने एक पोस्ट शेअर करुन अभिनंदनचं स्वागत केलं आहे. शाहरुख खानने ट्विटरवर तिरंगा झेंडा पोस्ट करत म्हटलं की, पुन्हा घरी येण्याची भावना काही वेगळीच असते. घर हे प्रेम, स्वप्न आणि आशेचं स्थान असतं. तुमची बहादुरी आम्हाला मजबूत करते.

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशाभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने अभिनंदची सुटका कोणत्याही अटीशर्तींवर अवलंबून नसल्याचे सांगितले. भारताने केलेल्या दबावानंतर पाकिस्ताकडून अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. अभिनंदन यांची सुटका केल्याने तणाव कमी होणार असेल तर अभिनंदन यांना शांततेच्या मार्गाने सोडणार असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे.

Continue Reading

मनोरंजन

कार पार्किंग’मध्ये Kiss करताना प्रियांका आणि निक, हॉट Pics सोशल मीडियावर Viral

Mahabatmi

Published

on

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे हॉट पिक्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये नवदाम्पत्य कार पार्किंगमध्ये गुपचूप किस करतानाही दिसत आहे. हे फोटोज Beverly Hills बिल्डिंगच्य पार्किंगमधील आहे.

प्रियांका आणि निकच्या रोमान्स सोशल मीडियावर पहिल्यादा व्हायरल झालेले नाही. यापूर्वीही दोघांचे इंटीमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रियांका कायम तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर निकसोबतचे कोझी फोटो शेअर करते. प्रियांका आणि निकचा रोमान्सचे त्यांचे फॅन्स दिवाने आहेत. व्हॅलेंटाईनलाही प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होते. त्यात दोघे खूप क्लोज आलेले दिसत आहेत. न्यू ईअरलाही प्रियांका-निकचा लिपलॉकचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला होता.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.