Connect with us

क्राईम

विठ्ठलवाडी पोलिसांनी २० लाख जुन्या नोटा जप्त‌ केले

Mahabatmi

Published

on

उल्हासनगर(गौतम वाघ) : हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या असतानाही या नोटांची डिमांड अजून कमी झालेली नाही. २० लाख १० हजार रकमेच्या जुन्या हजार व पाचशे रुपये दराच्या  चलनातून रद्द झालेल्या नोटा विठ्ठलवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या नोटा घेऊन आलेल्या लक्ष्मण उर्फ (लखन) मनुजा याला अटक करून एक स्विफ्ट डिझायर कार ताब्यात घेतली आहे.

संबधित इसम हजार व पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन सूर्या लॉज, दौलतमंतांनी चौक, उल्हासनगर- 4 येथे येणार असल्याची खबर पो.ना किशोर सुर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार उल्हासनगर परिमंडळ 4 चे उपायुक्त  प्रमोद शेवाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली व सहआयुक्त  मारुती जगताप, यांच्या सहकार्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र कदम, यांच्या पथकाने पोउपनि. शेळके, गुन्हे प्रकटीकरणाचे पो.ना.दिनेश पाटील. पो.ना.किशोर सुर्यवंशी पो.शि.समीर गायकवाड पो.ना सचिन कोळी, पो.ना दत्तात्रय मोरे, ह्यांनी सापळा रचुन सदर आरोपीला मुद्देमालासह अटक केलेली आहे सदर ची चौकशी हे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंन्द्र कदम हे करत असून यामागे कोण आहे आणि अजून किती नोटा आहेत याचा तपास करत आहे.

Advertisement

क्राईम

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

Mahabatmi

Published

on

नागपूर : जरीपटक्यातील आहुजानगरात राहणारा बुकी दिलीप खेमचंद प्रेमचंदानी (वय ३९) याच्याकडे छापा मारून पोलिसांनी टीव्ही, मोबाईलसह २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
प्रेमचंदानी अनेक दिवसांपासून क्रिकेट मॅचवर सट्ट्याची खायवाडी करतो. शनिवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला असता तो राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्स संघादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून खायवाडी करताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तेथून टीव्ही, पाच मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त केले. त्याच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, द्वितीय पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, उपनिरीक्षक अतुल डाके, हवालदार लखन कनोजिया, प्रदीप भैसे, हरिचंद भट, शिपाई प्रवीण मरापे, नारायण आणि महिला शिपाई कविता यांनी ही कामगिरी बजावली.
विशेष म्हणजे, उपाराजधानीत सर्वाधिक क्रिकेट बुकी जरीपटक्यात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बुक (बेटिंग) चालवितात. त्यातून रोज लाखोंची खायवाडी आणि लगवाडी करतात. पोलिसांनाही मोठी देण दिली जाते. ठाण्यातल्या ठाण्यात ही बाब माहीत असल्याने वरिष्ठांच्या कानापर्यंत तो प्रकारच जात नाही. वरिष्ठांनी लक्ष घातले तरच बुकीविरुद्ध कारवाई होते. जरीपटका पोलीस या प्रकारात अनेक वर्षांपासून वादग्रस्त भूमिका बजावत आहेत. या छाप्यात रजिस्टर जप्त करण्यात आले. त्यात अनेक सामन्यांच्या खायवाडी आणि लगवाडीच्या लाखोंच्या व्यवहाराची नोंद असल्याचे समजते. त्यावरून प्रेमचंदानी गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट सामन्याच्या बेटिंगमध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.
गणेशपेठमधील मटका अड्ड्यांवर छापे
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटक्याच्या दोन अड्ड्यांवर पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख ३६ हजार तसेच मोबाईल जप्त करण्यात आले.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजीपेठ आणि धम्मनगरात आरोपी संदीप वंजारी मटक्याचे अड्डे चालवितो. गणेशपेठ ठाण्यात महिन्याला तगडी देण देत असल्यामुळे त्याच्या मटका अड्ड्यावर पोलीस जात नाहीत. ही माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या विशेष पथकाच्या माध्यमातून १८ एप्रिलला गंजीपेठ व धम्मनगरातील मटका अड्ड्यावर छापा मारून रितेश गौतम सोमकुंवर (वय २४, रा. धम्मनगर), निखील घनश्याम बांगडे (वय २४, रा. भारतनगर, कळमना), अशोक नारायण घोडमारे (वय ४३, रा. गंजीपेठ गांधी चौक) आणि मिलिंद बाळाजी बोरीकर (वय ४५, रा. हंसापुरी, तहसील) या चौघांना अटक केली. त्याच्या ताब्यातून ३९,१९० रुपये तसेच मोबाईल असा एकूण ४२,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ तीनच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवराज जमदडे, पंकज वाघोडे, एएसआय मधुकर, नायक संदीप, संतोष शिपाई, पंकज वाघोडे, कोतवालीचे सहायक निरीक्षक निस्वादे आणि शिपाई सारंग यांनी ही कामगिरी बजावली.

Continue Reading

क्राईम

महिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये

Mahabatmi

Published

on

कानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट जिल्ह्यातील एका आश्रमात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महिलेने त्याला विरोध केल्यावर तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी बाबाला ताब्यात घेतले.

Continue Reading

क्राईम

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो

Mahabatmi

Published

on

नागपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली.

ऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या पत्नीचे एका वाहनचालकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. आठवडाभरापूर्वी ऋषिकांतची पत्नी त्या वाहनचालकासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पत्नी पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसांत दिली होती. या घटनेचा ऋषिकांत यांना मानसिक धक्का बसला. व्यथित झालेल्या ऋषिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान अगोदर ५ वर्षीय मुलीला ओढणीने गळफास लावला. नंतर दोन वर्षांच्या चिमुकलीसही असेच संपवले. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवले.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in