Connect with us

क्राईम

छेड काढणाऱ्या तरुणाचे महिलेने कापले लिंग

Mahabatmi

Published

on

डोंबिवली आपली सतत छेड काढतो, त्रास देतो आणि मनात लज्जा होईल असं वर्तन करतो म्हणून एका महिलेने आपल्या दोन मित्रांच्या साथीने एका ३० वर्षीय तरुणाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. मंगळवारी ८ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

डोंबिवलीतील नांदिवली भागात राहणाऱ्या एका महिलेने आपली छेड काढणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्याकरता रेल्वेरुळाशेजारील निर्जळ स्थळी हा सगळा प्रकार केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

या महिलेने ३० वर्षीय युवकाला स्थानकाशेजारील एकांकी ठिकाणी बोलावलं. तिथे आधीच दबा धरून बसलेले तिचे २ मित्र प्रतिक केनीया आणि तेजस म्हात्रे यांनी तो तरुण येताच त्याला पकडून झाडाला बांधलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.

एवढंच नाही तर त्या तरुणाचे लिंग कापले आणि तिथून पसार झाले. या घटनेची माहिती स्थानिकांकडून मानपाडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला जख्मी अवस्थेत डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल केलं. सध्या तरुणाची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पोलीसांनी त्या महिलेसह तिचे मित्र प्रतिक केनीया आणि तेजस म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर बुधवारी दुपारी कल्याण कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

Advertisement

क्राईम

मंत्रालयातील सहसचिव विजय पवारांनी पत्नीवर झाडल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

Mahabatmi

Published

on

पंढरपूर- मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरूवारी रात्री पत्नी सोनाली पवार यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. सोनाली यांना तत्काळ उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून मंगळवेढा तालुक्यातील ते पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. होळीची सुट्टी असल्याने ते मुंबईहून घरी आले होते. घरी असताना मध्यरात्री उशिरा पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता त्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉव्हरमधून पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पत्नीला तत्काळ खासगी रूग्णालयात नेले. प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना सोलापूरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्तिर आहे.

Continue Reading

क्राईम

पीक विम्याचे 10 हजार देण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून

Mahabatmi

Published

on

धारूर – पीक विमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केला. दोन महिन्यापूर्वी धारूर येथे घडलेल्या या घटनेत बुधवारी मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पाय घसरून पडल्याने वडिलांच्या डोक्याला इजा झाल्याचा बनाव मुलाने केला होता, मात्र पोलिस तपासात याचे बिंग फुटले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आश्रुबा कारभारी मुंडे (७४, अशोक नगर, धारूर ) असे मृत पित्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी डोक्याला मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरात पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडून डोक्याला चॅनल गेट लागल्याने वडील जखमी झाल्याचे आश्रुबा यांचा मुलगा बलभीम याने त्यावेळी पोलिसांना सांगितले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी आश्रुबा यांचा मृत्यू झाला. परंतु, मृतदेहावरील खुणा पाहून हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा, असा संशय पोलिसांना आला.त्यादृष्टीने त्यांनी तपास केला असता आश्रुबा आणि बलभीम यांच्यात अनुदानाच्या रकमेवरून जोरदार वाद सुरू होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता बलभीम यानेच वडिलांचा खून केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी सहफौजदार राजाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बलभीम याच्या विरोधात धारूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बलभीमला अटक केले असून गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक कुकलारे हे करत आहेत.

Continue Reading

क्राईम

अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार

Mahabatmi

Published

on

नांदेड- इयत्ता 8 वीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची मानवी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्ह्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 वीत शिकते. तिची आई विसरभोळी, वेडसर आहे. 1 मार्च रोजी नराधम बापाने बळाचा वापर करून जिवे मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने 12 मार्च रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेस सांगितले. त्यांनी मुलीचे आजोबा (आईचे वडील) व आजी (आईची आई) यांना शाळेत बोलावून मुलीसोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. यानंतर पीडित मुलीने आजी-आजोबांसोबत 14 मार्च रोजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

March 2019
M T W T F S S
« Feb    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.