Connect with us

क्राईम

भय्यू महाराज यांच्या विश्वासातला सेवेकरी पोलिसांच्या ताब्यात,अश्लील व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत होता

Mahabatmi

Published

on

इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या विश्वासातील सेवेकरी विनायक दुधाळेला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर विनायक फरार झाला होता. अखेर इंदूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेतले. विनायकसह इतर दहा जणांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

विनायक दुधाळे, शरद देशमुख, शेखर पंडित आणि पलक नावाच्या महिलेच्या सहाय्याने ड्राइव्हर कैलास पाटील हा पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती भय्यू महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे पोलिसांना दिली होती. तेव्हापासून इंदूर पोलिस विनायकचा शोध घेत होते.

दरम्यान, भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. दोघांनी डीआजींकडे ड्राइव्हरचा जबाब नोंदविण्याची मागणी केली आहे. तसेच तरुणी आणि दोन सेेवेकरींवर ब्लॅकमेलींगचा आरोपही केला होता.

Advertisement

क्राईम

लष्करातील जवानाच्या पत्नीचे आक्षेपार्ह कृत्य पाहून सरकली पायाखालील जमीन

Mahabatmi

Published

on

Continue Reading

क्राईम

कराचीत गँग्सटर फारुकची गोळ्या झाडून हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई – भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी दाऊदचा आणखी एक जवळिक छोटा शकीलने फारुकची हत्या केली असे वृत्त आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच दुबईमध्ये फारुकला अटक केली होती. परंतु, दुबईतून भारतात आणण्यात यश आले नाही. यानंतर आता त्याचा पाकिस्तानात खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Continue Reading

क्राईम

विषारी इंजेक्शन देऊन महिला वकिलाची हत्या

Mahabatmi

Published

on

जळगाव- जामनेर शहरात महिला सरकारी वकिलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राखी उर्फ विद्या भरत पाटील (वय-37) असे मृत महिलेचे नाव आहे. भरत पाटील याचे विवाहबाह्य संबंध असून त्यानेच विषारी इंजेक्शन टोचून राखीची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, राखी भरत पाटील या जळगाव येथील कोर्टात सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती भरत लालसिंग पाटील यांचे हुद्द्याने डॉक्टर असून जामनेर शहरात क्लिनिक आहे. दोघे जामनेर शहरातील सुपारी बागेच्या मागे राहात होते. दोघांना पूर्वेश आणि सोनू अशी दोन मुले आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.