Connect with us

क्राईम

सरकारी वकीलाने न्यायाधीशांवर केला हल्ला

Mahabatmi

Published

on

नागपूर– सेशन कोर्ट परिसरात सरकारी वकीलाने न्यायाधीशांना मारहाण केल्याची घटना घडली. नंतर सरकारी वकीलाने कोर्टाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

दीपेश पराते असे न्यायाधीशांना हल्ला करणार्‍या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश के. आर. देशपांडे यांनी एका खटल्याचा न‍िकाल द‍िला होता. मात्र, या निर्णयावर दीपेश पराते याने नाराजी व्यक्त केली होती. संतापलेल्या पराते याने कोर्ट परिसरात न्यायाधिश देशपांडे यांना मारहाण केली. नंतर पराते याने कोर्टाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त‍ितक्यात कर्तव्यावर हजर असलेला पोलिस शिपाई संतोष पांडे यांनी पराते याचा कोट पकडून मागे खेचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे कोर्ट परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सरकारी वकील दीपेश पराते याला अटक केली आहे.

Advertisement

क्राईम

लष्करातील जवानाच्या पत्नीचे आक्षेपार्ह कृत्य पाहून सरकली पायाखालील जमीन

Mahabatmi

Published

on

Continue Reading

क्राईम

कराचीत गँग्सटर फारुकची गोळ्या झाडून हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई – भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी दाऊदचा आणखी एक जवळिक छोटा शकीलने फारुकची हत्या केली असे वृत्त आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच दुबईमध्ये फारुकला अटक केली होती. परंतु, दुबईतून भारतात आणण्यात यश आले नाही. यानंतर आता त्याचा पाकिस्तानात खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Continue Reading

क्राईम

विषारी इंजेक्शन देऊन महिला वकिलाची हत्या

Mahabatmi

Published

on

जळगाव- जामनेर शहरात महिला सरकारी वकिलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राखी उर्फ विद्या भरत पाटील (वय-37) असे मृत महिलेचे नाव आहे. भरत पाटील याचे विवाहबाह्य संबंध असून त्यानेच विषारी इंजेक्शन टोचून राखीची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, राखी भरत पाटील या जळगाव येथील कोर्टात सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती भरत लालसिंग पाटील यांचे हुद्द्याने डॉक्टर असून जामनेर शहरात क्लिनिक आहे. दोघे जामनेर शहरातील सुपारी बागेच्या मागे राहात होते. दोघांना पूर्वेश आणि सोनू अशी दोन मुले आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.