Connect with us

क्राईम

मॉडेलवर बलात्कार करून तिच्या पतीला पाठविले अश्लील फोटो

Mahabatmi

Published

on

मुंबई- फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत कास्टिंग काउच (कामाच आमिष दाखवून लैंगिक शोषण करणे) चा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशाच एका खटल्यात मुंबईतील एका सेशन कोर्टाने कास्टिंग डायरेक्टरला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेली माहिती अशी की, रवींद्रनाथ घोष असे शिक्षा झालेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे. रवींद्रनाथ घोष याने 23 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेलव बलात्कार केला होता. एवढेच नाही तर पीडित मॉडेलच्या पतीला पत्नीचे अश्लील फोटो पाठविले होते. दोषी सध्या तुरंगाची हवा खात आहे. कोर्टाने त्याला 1 लाख 31 हजार रुपये दंडही सुनावला आहे. त्यापैकी एक लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मॉडेलला देण्यात येणार आहे.

 प्रकरण 2011 मधील आहे. पीडिता एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिथे आरोपीची भेट झाली होती. आरोपीने पीडितेला सांगितले होते की, तो कॅमेरामन आणि कास्टिंग डायरेक्टर आहे. तसेच तो एक टेलिव्हिजन सीरीजचे प्रोडक्शन करत आहे. यासाठी त्याला एका महिला मॉडेलची आवश्यकता आहे. पी‍डितेने सीरीजमध्ये काम करण्यास रुची दर्शवली. घोष याने एका महिन्यात पीडितेला टीव्ही शोच्या ऑडिशनसाठी पाठवले. मात्र, त्या बदलल्यात शरीर सुखाची मागण केली.

शरीर सुखाची मागणी पूर्ण करण्यास पीडितेने आरोपीला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आरोपीने दोन आठवड्यानंतर पीडितेला फोन केला. महिेलेला टेलिव्हिजन सीरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. शूटिंगसाठी मड आयलंडवर जायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले. मड आयलंड येथे नेऊन एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने पीडितेचे अश्लिल फोटो काढले. नंतर अश्लिल फोटोवरून तिला ब्लॅकमेल करून तिच्याव मार्च 2012 पर्यंत वारंवार बलात्कार केला.

 पीडितेने आरोपी घोषच्या लैंगिक छळाला कंटाळून नोकरी बदलली. परंतु आरोपीचा त्रास कमी झाला नाही. अखेर पीडिता सापूतारा येथे पतीकडे राहाण्यास गेली. नंतर डिसेंबर 2012 मध्ये परत मुंबईला आली. तेव्हा ती गरोदर होती. आरोपीने पुन्हा तिची भेट घेतली. पिछा सोडण्यासाठी तिला एक लाख रुपयाची मागणी केली. डिलिव्हरी झाल्यानंतर पैसे देते असे पीडितेने सांगून वेळ मारून नेली आणि 2013 मध्ये तिने मोबाइल क्रमांक बदलला.

Advertisement

क्राईम

फिल्मी स्टाईलने अपहरण झालेल्या मुलाचा लावला छडा

Mahabatmi

Published

on

गुन्हे अन्वेषन शाखेची दमदार कामगीरी सोळा तासांच्या आत आरोपीला केलं जेरबंद.

उल्हासनगर (गौतम वाघ)-उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात काल संध्याकाळी तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता ,या गुन्ह्यात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करून आरोपीस सोळा तासात अटक करून मुलाला पालकांच्या ताब्यात दिले.

उल्हासनगरच्या सह्याद्री नगर मध्ये शारदा सिंग या राहतात ,गुरुवार संध्याकाळी त्यांचा मुलगा भावेश हा तीन वर्षांचा मुलगा खेळता खेळता कोणीतरी अज्ञात इसमाने उचलून घेऊन गेला,लागलीच शारदा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संध्याकाळी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला,यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला,या तपासात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने उडी घेतली आणि मुलाच्या आई ची चौकशी सुरू केली,या दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या मावशीला एका व्यक्तीचा फोन आला आणि तो फोन होता तो मावशी वर सुरत मध्ये एकतर्फी प्रेम करणाऱ्या सुरज सिंग चा, त्याने त्या मुलाच्या मावशीला कुर्ला येथे एकटी येण्यास सांगितलं.आणि जर नाही आल्या(भावेश) ह्याला ठार मारेल अशी धमकी दिली,लागलीच पोलिसांनी सूत्र हलवली आणि कुर्ला स्टेशन गाठले,तेवढ्यात आरोपीने मुलाच्या मावशीला विक्रोळी स्टेशन वर बोलावलं तेथून सुद्धा आरोपीने पळ काढत ,ठाणे स्टेशनच्या पाच नंबर फलाटावर त्या मुलाच्या मावशी ला भेटण्यास येण्यास सांगितले ,पोलिसांनी सापळा रचला आणि तो आरोपी ठाणे स्टेशन च्या पाच नंबर फलाटावर इंडिकेटर खाली उभा असल्याचे पाहून पोलिसांनी मुलाच्या मावशीला सूरज ला भेटण्यास पाठवले ,मुलाच्या मावशी ने सूरज ला भेटल्यावर मुलाला आपल्या ताब्यात घेऊन गळे लावलं तेवढ्यात पोलिसांनी आरोपी सूरज सिंग यास शिताफीने अटक केली व मुलाला पालकाच्या ताब्यात दिल.

Continue Reading

क्राईम

सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवायचा 65 वर्षांचा सासरा, विरोध करणाऱ्या मुलाचे कुऱ्हाडाने केले 6 तुकडे

Mahabatmi

Published

on

जालंधर – अनैतिक संबंधांमध्ये आंधळा झालेल्या एका 65 वर्षीय नराधमाने आपल्याच मुलाची निर्घृण हत्या केली. आरोपी आपल्या 35 वर्षीय सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवत होता. यासंदर्भात मुलाला कळाले तेव्हा त्याने वडिलांना विरोध केला. त्यावर आरोपी इतका संतापला की त्याने मुलगा झोपेत असताना त्याच्यावर अचानक हल्ला केला. तसेच कुऱ्हाडाने त्याच्या शरीराचे 6 तुकडे केले. यानंतर दोन पोत्यांमध्ये ते तुकडे भरून मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना तो पकडला गेला. पोलिसांनी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करून त्याला अटक केली.

पीडित युवकाचे नाव राजविंदर असून तो आपले वडील छोटा सिंग, भाऊ राजबीर सिंग आणि पत्नीसोबत राहत होता. याच दरम्यान वडील छोटा सिंगने राजविंदरच्या पत्नीवर बलात्कार केला. यानंतर तिच्यावर दबाव टाकून अनेक वेळा शारिरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर एक दिवस पीडित महिलेने आपली आपबिती पती राजविंदरला सांगितली. याच गोष्टीवरून मंगळवारी मुलगा राजविंदर आणि वडील छोटा सिंगमध्ये जोरदार वाद पेटला. राजविंदरचा भाऊ राजबीरने दिलेल्या माहितीनुसार, भांडणाच्या रात्री राजविंदर झोपेत असताना अचानक छोटा सिंगने त्याच्यावर कुऱ्हाडीने प्रहार केले. ठार मारल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले. तसेच हे तुकडे पोत्यांमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांना बोलावण्यात आले आणि नराधमाला अटक करण्यात आली.

Continue Reading

क्राईम

वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई | माहीम परिसरातील एल जे. रोडवर काल मध्यरात्री अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रस्त्यावर आई वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय मुलीला एका अज्ञात नराधमाने पळवून नेले. तिचे लैंगिक शोषण करून तिचा हत्या करून पळ काढला. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.