Connect with us

क्राईम

#Meetoo: पत्रकार प्रिया रमानीला अब्रुनुकसान प्रकरणी कोर्टाचे समन्स

Mahabatmi

Published

on

नवी दिल्ली – माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांना पटियाला हाऊस कोर्टाने आरोपी म्हणून समन्स पाठवले आहेत. अब्रु नुकसानीच्या प्रकरणामध्ये त्यांना 25 फेब्रुवारी रोजी पटियाला हाऊस कोल्टात सादर व्हावे लागेल.

एमजे अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्या विरोधात गेल्यावर्षी पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यांनी अब्रुनुकसानीशी संबंधित आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत प्रिया यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तक्रारीत म्हटले आहे की, लैंगिक शोषणाच्या आरोपांनी अकबर यांची बदनामी तर झालीच पण त्याचबरोबर अनेक वर्षांच्या परिश्रमाने मिळवलेल्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेलाही हानी पोहोचली आहे.

प्रिया रमानी यांनी ट्विटरवर स्टेटमेंट देत म्हटले की, अनेक महिलांनी खासगी आणि व्यावसायिक जीवन धोक्यात घालत अकबर यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. प्रिया म्हणाल्या की, अब्रुनुकसानीच्या आरोपांच्या विरोधात लढायला त्या तयार आहेत. कारण सत्य हेच त्यांचे एकमेव शस्त्र आहे. आरोपांचा संबंध राजकीय कटाशी जोडणे वेदनादायी आहे. पण माझ्या विरोधात अबरुनुकसानीचा दावा दाखल करून त्यांनी स्टँड स्पष्ट केला आहे. त्यांना घाबरवून शोषण केलेल्या महिलांना शांत बसवायचे आहे.

प्रिया रमानी यांच्यानंतर गजाला वहाब, शुमा राहा, अंजू भारती आणि शुतापा पॉलसह 12 महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यापैकी कोणीही अकबर यांच्या विरोधात तक्रार केलेली नाही.

Advertisement

क्राईम

फिल्मी स्टाईलने अपहरण झालेल्या मुलाचा लावला छडा

Mahabatmi

Published

on

गुन्हे अन्वेषन शाखेची दमदार कामगीरी सोळा तासांच्या आत आरोपीला केलं जेरबंद.

उल्हासनगर (गौतम वाघ)-उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात काल संध्याकाळी तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता ,या गुन्ह्यात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करून आरोपीस सोळा तासात अटक करून मुलाला पालकांच्या ताब्यात दिले.

उल्हासनगरच्या सह्याद्री नगर मध्ये शारदा सिंग या राहतात ,गुरुवार संध्याकाळी त्यांचा मुलगा भावेश हा तीन वर्षांचा मुलगा खेळता खेळता कोणीतरी अज्ञात इसमाने उचलून घेऊन गेला,लागलीच शारदा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संध्याकाळी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला,यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला,या तपासात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने उडी घेतली आणि मुलाच्या आई ची चौकशी सुरू केली,या दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या मावशीला एका व्यक्तीचा फोन आला आणि तो फोन होता तो मावशी वर सुरत मध्ये एकतर्फी प्रेम करणाऱ्या सुरज सिंग चा, त्याने त्या मुलाच्या मावशीला कुर्ला येथे एकटी येण्यास सांगितलं.आणि जर नाही आल्या(भावेश) ह्याला ठार मारेल अशी धमकी दिली,लागलीच पोलिसांनी सूत्र हलवली आणि कुर्ला स्टेशन गाठले,तेवढ्यात आरोपीने मुलाच्या मावशीला विक्रोळी स्टेशन वर बोलावलं तेथून सुद्धा आरोपीने पळ काढत ,ठाणे स्टेशनच्या पाच नंबर फलाटावर त्या मुलाच्या मावशी ला भेटण्यास येण्यास सांगितले ,पोलिसांनी सापळा रचला आणि तो आरोपी ठाणे स्टेशन च्या पाच नंबर फलाटावर इंडिकेटर खाली उभा असल्याचे पाहून पोलिसांनी मुलाच्या मावशीला सूरज ला भेटण्यास पाठवले ,मुलाच्या मावशी ने सूरज ला भेटल्यावर मुलाला आपल्या ताब्यात घेऊन गळे लावलं तेवढ्यात पोलिसांनी आरोपी सूरज सिंग यास शिताफीने अटक केली व मुलाला पालकाच्या ताब्यात दिल.

Continue Reading

क्राईम

सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवायचा 65 वर्षांचा सासरा, विरोध करणाऱ्या मुलाचे कुऱ्हाडाने केले 6 तुकडे

Mahabatmi

Published

on

जालंधर – अनैतिक संबंधांमध्ये आंधळा झालेल्या एका 65 वर्षीय नराधमाने आपल्याच मुलाची निर्घृण हत्या केली. आरोपी आपल्या 35 वर्षीय सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवत होता. यासंदर्भात मुलाला कळाले तेव्हा त्याने वडिलांना विरोध केला. त्यावर आरोपी इतका संतापला की त्याने मुलगा झोपेत असताना त्याच्यावर अचानक हल्ला केला. तसेच कुऱ्हाडाने त्याच्या शरीराचे 6 तुकडे केले. यानंतर दोन पोत्यांमध्ये ते तुकडे भरून मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना तो पकडला गेला. पोलिसांनी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात हत्येचा खटला दाखल करून त्याला अटक केली.

पीडित युवकाचे नाव राजविंदर असून तो आपले वडील छोटा सिंग, भाऊ राजबीर सिंग आणि पत्नीसोबत राहत होता. याच दरम्यान वडील छोटा सिंगने राजविंदरच्या पत्नीवर बलात्कार केला. यानंतर तिच्यावर दबाव टाकून अनेक वेळा शारिरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर एक दिवस पीडित महिलेने आपली आपबिती पती राजविंदरला सांगितली. याच गोष्टीवरून मंगळवारी मुलगा राजविंदर आणि वडील छोटा सिंगमध्ये जोरदार वाद पेटला. राजविंदरचा भाऊ राजबीरने दिलेल्या माहितीनुसार, भांडणाच्या रात्री राजविंदर झोपेत असताना अचानक छोटा सिंगने त्याच्यावर कुऱ्हाडीने प्रहार केले. ठार मारल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले. तसेच हे तुकडे पोत्यांमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांना बोलावण्यात आले आणि नराधमाला अटक करण्यात आली.

Continue Reading

क्राईम

वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई | माहीम परिसरातील एल जे. रोडवर काल मध्यरात्री अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रस्त्यावर आई वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय मुलीला एका अज्ञात नराधमाने पळवून नेले. तिचे लैंगिक शोषण करून तिचा हत्या करून पळ काढला. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.