Connect with us

क्राईम

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो

Mahabatmi

Published

on

नागपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली.

ऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या पत्नीचे एका वाहनचालकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. आठवडाभरापूर्वी ऋषिकांतची पत्नी त्या वाहनचालकासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पत्नी पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसांत दिली होती. या घटनेचा ऋषिकांत यांना मानसिक धक्का बसला. व्यथित झालेल्या ऋषिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान अगोदर ५ वर्षीय मुलीला ओढणीने गळफास लावला. नंतर दोन वर्षांच्या चिमुकलीसही असेच संपवले. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवले.

Advertisement

क्राईम

महिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये

Mahabatmi

Published

on

कानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट जिल्ह्यातील एका आश्रमात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महिलेने त्याला विरोध केल्यावर तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी बाबाला ताब्यात घेतले.

Continue Reading

क्राईम

आयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार

Mahabatmi

Published

on

मेरठ – उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि चार पुरुष अशा 5 जणांना अटक केली आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या एका विवाहितेला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूत दाखल होण्याचा सल्ला दिला. याच ठिकाणी तिला आरामासाठी झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. झोपेत असतानाच रुग्णालयाच्या स्टाफने तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. यानंतर एक-एक करून 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारात स्टाफच्या एका महिलेचा देखील हात आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा काही तासांचे फुटेज गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सविस्तर तपास करण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.

Continue Reading

क्राईम

दारूच्या व्यसनापायी एका मुलाने केली स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Mahabatmi

Published

on

उल्हासनगर( गौतम वाघ )-

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार मध्ये दारूच्या व्यसनापायी एका मुलाने स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पालकांच्या तक्रारीनंतर र मुलाचा पोलिसांनी शोध लावून त्याला पोलिसांनी अटक करून साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे लक्ष्मी हाईट्स इमारतीत राहणारे नेनमल रावल यांच्या घरातील दागिने चोरी झाल्याची तक्रार 23 मार्च रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती,मात्र त्या दिवसा पासून त्यांचा मुलगा संतोष हा सुद्धा घरातुन गायब होता,त्यामुळे पोलिसांना संतोष वर चोरीचा संशय बळावला,पोलिसांनी संतोषचा मोबाईल नंबर ट्रेस करून संतोष ला ताब्यात घेतले,त्यानंतर पोलिसांनी संतोष ला पोलिसी इंगा दाखवला असता संतोष ने घरात दागिने चोरी केल्याचे कबुल केले,दोन दिवसात संतोषने काही दागिने गहाण ठेवले आणि काही दागिने सोनाराकडे मोडून पैसे घेतल्याचे संतोष ने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले,फक्त दारूच्या व्यसनापायी संतोषने स्वतःच्याच घरात तीन लाख साठ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संतोष विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांच्या तक्रारीमुळे चोर मुलगा पोलिसांच्या हाती लागला असून ,संतोषला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संतोषला २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल सोनावने करत आहेेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in