Connect with us

क्राईम

पत्नीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो न्यायालयात सादर केल्यामुळे माजी मिस्टर इंडिया अडचणीत

Mahabatmi

Published

on

पत्नीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो न्यायालयात सादर केल्यामुळे माजी मिस्टर इंडिया आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अडचणीत सापडला आहे. सध्या हे जोडपे वेगळे रहात असून वांद्रे कौटुंबिक न्यायालयात त्यांचा घटस्फोटाचा खटला सुरु आहे. बीकेसी पोलिसांनी पती विरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन ते फोटो फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

माझ्या सासूबाईंनी माझे न्यूड फोटो त्यांच्याकडे असून ते व्हायरल करण्याची मला धमकी दिली होती. मागच्यावर्षीच मी पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती असे पत्नीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र रहात असताना माझे त्यावेळचे काही आक्षेपार्ह फोटो नवऱ्याकडे आहेत.

माझ्या नवऱ्याने कोर्टात सादर केलेले आक्षेपार्ह फोटोपाहून मला धक्का बसला. दुसऱ्या महिलेचे हे फोटो असून त्यावर माझा चेहरा लावण्यात आला आहे असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. एका महिला म्हणून माझ्यासाठी हे खूप घृणास्पद, धक्कादायक आहे. मी एका अल्पवयीन मुलीची आई सुद्धा आहे असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

क्राईम

महिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये

Mahabatmi

Published

on

कानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट जिल्ह्यातील एका आश्रमात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महिलेने त्याला विरोध केल्यावर तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी बाबाला ताब्यात घेतले.

Continue Reading

क्राईम

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो

Mahabatmi

Published

on

नागपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली.

ऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या पत्नीचे एका वाहनचालकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. आठवडाभरापूर्वी ऋषिकांतची पत्नी त्या वाहनचालकासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पत्नी पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसांत दिली होती. या घटनेचा ऋषिकांत यांना मानसिक धक्का बसला. व्यथित झालेल्या ऋषिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान अगोदर ५ वर्षीय मुलीला ओढणीने गळफास लावला. नंतर दोन वर्षांच्या चिमुकलीसही असेच संपवले. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवले.

Continue Reading

क्राईम

आयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार

Mahabatmi

Published

on

मेरठ – उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि चार पुरुष अशा 5 जणांना अटक केली आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या एका विवाहितेला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूत दाखल होण्याचा सल्ला दिला. याच ठिकाणी तिला आरामासाठी झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. झोपेत असतानाच रुग्णालयाच्या स्टाफने तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. यानंतर एक-एक करून 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारात स्टाफच्या एका महिलेचा देखील हात आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा काही तासांचे फुटेज गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सविस्तर तपास करण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

April 2019
M T W T F S S
« Mar    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

महत्वाच्या बातम्या

© Copyright 2019 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited. / Developed by sahaajmedia.in