Connect with us

क्राईम

धर्म परिवर्तन करून आफ्रिकेला जाणा-या तरूणाला अटक

Mahabatmi

Published

on

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे धर्म परिवर्तन करून व खोट्या माहितीच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून पासपोर्ट व इतर कागदपत्रे मिळवणाऱ्या एका व्यक्तीवर दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. नरसिंग जयराम भुयकर उर्फ महमद रेहान इबनेआदम (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरसिंग उर्फ महमद रेहान हा दक्षिण आफ्रिकेत धार्मिक कार्यक्रमास  जाण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येते.

भुयकर उर्फ इबनेआदम हा मुळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील झहिराबादचा रहिवासी आहे. तो उदगीर येथे एका बेकरीत काम करत होता. त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड, आई-वडिलांचे बनावट पॅनकार्ड बनवून पासपोर्ट काढला. तसेच आई-वडिलांचे काल्पनिक नाव, शैक्षणिक पात्रता व कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता याबाबतही खोट्या माहितीच्या आधारे एचडीएफसी बँकेत खाते उघडले होते. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने शासनाची फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.

दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या फिर्यादीवरून नरसिंग जयराम उर्फ मोहम्मद रेहान इबनेआदम याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

क्राईम

लष्करातील जवानाच्या पत्नीचे आक्षेपार्ह कृत्य पाहून सरकली पायाखालील जमीन

Mahabatmi

Published

on

Continue Reading

क्राईम

कराचीत गँग्सटर फारुकची गोळ्या झाडून हत्या

Mahabatmi

Published

on

मुंबई – भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी दाऊदचा आणखी एक जवळिक छोटा शकीलने फारुकची हत्या केली असे वृत्त आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच दुबईमध्ये फारुकला अटक केली होती. परंतु, दुबईतून भारतात आणण्यात यश आले नाही. यानंतर आता त्याचा पाकिस्तानात खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Continue Reading

क्राईम

विषारी इंजेक्शन देऊन महिला वकिलाची हत्या

Mahabatmi

Published

on

जळगाव- जामनेर शहरात महिला सरकारी वकिलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राखी उर्फ विद्या भरत पाटील (वय-37) असे मृत महिलेचे नाव आहे. भरत पाटील याचे विवाहबाह्य संबंध असून त्यानेच विषारी इंजेक्शन टोचून राखीची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, राखी भरत पाटील या जळगाव येथील कोर्टात सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती भरत लालसिंग पाटील यांचे हुद्द्याने डॉक्टर असून जामनेर शहरात क्लिनिक आहे. दोघे जामनेर शहरातील सुपारी बागेच्या मागे राहात होते. दोघांना पूर्वेश आणि सोनू अशी दोन मुले आहेत.

Continue Reading
Advertisement
Advertisement

Follow us on Facebook

Mahabatmi Calendar

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited.