Connect with us

राजकीय

मोदींच्या पंधरा लाखाच्या आश्वासनाची राष्ट्रवादीने केली उलट तपासणी !परळीत “बॅलन्स चेक करो” आंदोलन

Published

on

Against the backdrop of Modi's assurance of fifteen lakhs, NCP has given a re-examination

परळी | मोदी सरकारच्या आपल्या खात्यावर पंधरा लाखाच्या आश्वासनाची राष्ट्रवादी काँग्रेसने उलट तपासणी केली आहे. परळीत “बॅलन्स चेक करो” आंदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने देशातील जनतेला आशेला ला लावून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या फसव्या आंदोलनाची खिल्ली उडवत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यावर पंधरा लाखाच्या आश्वासनाची ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने उलट तपासणी केली आहे.

बँकेत जाऊन प्रतीकात्मक पासबुक एन्ट्री करून “बॅलन्स चेक करो” असे अभिनव आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

*केंद्रातील एनडीए सरकारला साडेचार वर्षे तर राज्यातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु या कालावधीत जनतेच्या नशिबी घोर निराशेशिवाय दुसरे काही आले नाही.अनेक फेकू व चमकु आश्वासनांनी जनतेला भूलथापांशिवाय पदरी काही पडले नाही. या जनविरोधी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे.

हा रोष विविध मार्गाने बाहेर पडत आहे. या अनुषंगाने पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचा भांडाफोड करण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने “बॅलन्स चेक करो” असे अभिनव आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी आपापली पासबुके घेऊन आले आणी पदरी निराशा पाहुन राष्ट्रवादी चा हलवा खाऊन परतले.यावेळी सामान्य नागरीक राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

राजकीय

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

Published

on

Shiv Sena Bjp Alliance

जालना | आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती व्हावी अशी इच्छा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच शिवसेना आणि भाजपची युती होणार असून पुन्हा मीच जालन्याचा खासदार होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

सर्व मतदारसंघात फिरत असून प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्याची इच्छा ही युती व्हावी अशी असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे.जालन्यातील दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी

दरम्यान युती झाली तर जालना लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेन दावा केला आहे. त्यामुळे यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं एकला चलोची हाक दिली आहे. तरीही भाजपकडून शिवसेनेला युतीसाठी गोंजारण्याचं काम अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

साहेब,अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय! पाठवू का?

Published

on

Raj Thackeray Targets to Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीतून निशाणा साधला आहे. आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे.  याचाच संदर्भ घेत राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यावर टीका केली आहे. या चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की,  साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ‘धुवायला’ आलाय, पाठवू का?. तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.

एकूणच, राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

#Diwali2018 #RTist #RajThackeray #cartoons #दिवाळी #Abhyangasnan #Maharashtra #devendrafadnvis

Posted by Raj Thackeray on Monday, November 5, 2018

Continue Reading

महाराष्ट्र

सरकारच्या नाकर्तेपणाची 4 वर्षे ; परळीत राष्ट्रवादीचा होर्डिंग्जद्वारे हल्लाबोल!

Published

on

परळी वैजनाथ | केंद्रातील एनडीए सरकारला साडेचार वर्षे तर राज्यातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु या कालावधीत जनतेच्या नशिबी घोर निराशेशिवाय दुसरे काही आले नाही. अनेक फेकू व चमकु आश्वासनांनी जनतेला भूलथापांशिवाय पदरी काही पडले नाही. या जनविरोधी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. हा रोष विविध मार्गाने बाहेर पडत आहे. या अनुषंगाने  सरकारच्या नाकर्तेपणावर  परळीत राष्ट्रवादी काँग्रेसने  होर्डिंग्जद्वारे हल्लाबोल चढवला आहे. या द्वारे सामान्यांच्या मनातले संतप्त  सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

सरकारच्या नाकर्तेपणाचा वेळोवेळी सातत्याने सभागृहात आणि सभागृहाबाहेर भांडाफोड करत सर्वस्तरातील घटकांचा सरकार विरुद्धचा रोष व आवाज बुलंद करण्याची भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी घेतलेली आहे. या भुमिकेचा प्रभाव राषविश्वासदी काँग्रेस व नागरिकांत मोठा असून परळीत या अनुषंगाने सरकारच्या चार वर्षे पूर्ण कालावधीत जन विरोधी धोरणांमुळे सामान्य नागरिकांच्या मनातील सरकारविरुद्धची एकप्रकारे चीड या होर्डिंग्जद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

उपस्थित करण्यात आलेले प्रश्न –

 1. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला काय?
 2. अन्नदात्याच्या शेतमालाला हमीभाव दिला गेला का ?
 3. बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या काय?
 4. आमच्या मराठा,धनगर,मुस्लीम बांधवांना आरक्षण मिळाले काय?
 5. महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला काय?
 6. महाराष्ट्र्र टोलमुक्त झाला काय?
 7. जीवनावश्यक वस्तु स्वस्त झाल्या की महागल्या?
 8. पेट्रोल,गॅस सिलेंडर स्वस्त झाल की महाग?
 9. जलयुक्त च्या कामांनी भुजल पातळी वाढली की घटली?
 10. अवघ्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे स्मारकाचे कार्य सुरु होण्यास विलंब का?
 11. महाराष्ट्रातील नोकरदार, व्यापारी, गृहिणी विद्यार्थी,लघु उद्योजक सगळेच नाखुष मग सरकार चालतय कुणाचे समाधान करण्यासाठी?

राष्ट्रवादी काँग्रेस परळी च्या वतीने नाकर्त्या आणि असंवेदनशील सरकारचा जाहीर निषेध या होर्डिंग्जद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.

“सामान्य जनतेला पडलेले भाबडे प्रश्न” या टॅगलाईनने विविध संतप्त सवाल उपस्थित करून अतिशय खुमासदार पद्धतीने व वास्तविक व्यंगचित्रातून सरकारला सवाल करण्यात आले आहेत. शहरात ठिक ठिकाणी ठळकपणे लावण्यात आलेले होर्डिंग्ज लक्षवेधी ठरत आहेत.

सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे सामान्य नागरिकांच्या मनातील सरकारविरुद्धची एकप्रकारे चीड आम्ही होर्डिंग्जद्वारे रस्त्यावर व्यक्त करत आहेत.विरोधीपक्ष म्हणून जनतेचा आवाज बननण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेत सरकार विरुद्ध असलेला रोष नक्की येत्या काळात सत्तेत परिवर्तन घडवून आणेल हा विश्वास आहे.

Continue Reading

राजकीय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दला कुठून सुरूवात झाली?…

Published

on

23 जानेवारी 2018 रोजी त्यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या कारकीर्दीला 5 वर्षे पूर्ण झाली.तत्पूर्वी ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 30 जानेवारी 2003 रोजी शिवसेनेच्या महाबळेश्वर येथे भरलेल्या शिबिरात राज ठाकरेंनी “शिवसेनेत नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्ययक्ष पदावर शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची निवड या प्रतिनिधी सभेने करावी” असं म्हणत प्रस्ताव मांडला व त्याला उपस्थित सर्वांनी एकमताने मंजूरी दिली. तरीही त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि शिवसेनेवर, शिवसेना प्रमुखांवर तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करत आपल्यावर अन्याय कसा झाला याचे महाराष्ट्रभर जाहीर प्रदर्शन मांडले होते.त्यामुळे तेंव्हा राज ठाकरेंना सर्व स्तरांतून प्रचंड सहानुभूती मिळाली तर उद्धव ठाकरेंना प्रचंड टीकेचा “सामना” करावा लागला. हा सगळा घटनाक्रम अगदी आजही महाराष्ट्रभर “मसाला” लावून चर्चिला जातो.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द इथूनच सुरू झाली. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे उद्धव ठाकरे थेट “शिवसेना कार्याध्यक्ष” पदावर विराजमान झाले आणि राज ठाकरेंवर अन्याय झाला असं “गोड गैरसमज” महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील बहुतांश जनतेला आहे. “हाफ नॉलेज ईज डेंजरस” अशी इंग्रजी म्हण आहे. दुर्दैवाने उद्धव ठाकरे राजकरणात आल्याची “मसालेदार” गोष्ट ऐकण्यातच आणि सत्य जाणून न घेता त्यांच्यावर सडकून टीका अगदी आजही करण्यात महाराष्ट्र व्यस्त आहे.

मार्च 2013 मध्ये “सामना”,एबीपी माझा इत्यादींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मी दादरकर” या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बोलताना ते शिवसेनेच्या राजकरणात कसे आले? याचा उलगडा केला होता. सुरूवातीला बाळासाहेबांची भाषणं उद्धवजी शिवतीर्थाच्या मातीत बसून ऐकत असत.तो काळ 1985 चा होता.बाळासाहेब शिवसेनेवर होणारी टीका “मार्मिक” मधून परतवून लावत असत.“मार्मिक” हे साप्ताहिक होतं.शिवसेना वाढत असल्याने शिवसेनेवर होणारी टीकाही वाढत होती. त्यामुळे त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेला दैनिकाची गरज भासत होती.बाळासाहेब मार्मिक वर्धापनदिन सोहळ्यात दोन-तीन वेळा “मार्मिक” लवकरच दैनिकाच्या रूपात दिसेल असं बोलले पण त्याचा पाठपुरावा होत नव्हता.बाळासाहेबांच्या वाढत्या व्यापामुळे त्यांना दैनिक सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता.

ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी बाळासाहेबांशी बोलून दैनिकाची जबाबदारी घेतली.सोबतीला बाळासाहेबांच्या “टीम” मधील सुभाष देसाई यांना सोबतीला घेतलं.कालांतराने 23 जानेवारी 1988 रोजी “सामना” हे शिवसेनेच मुखपत्र असलेलं दैनिक सुरू झालं. यादरम्यान उद्धव ठाकरे “सामना” च्या कार्यालयात बसत असत.तिथे शिवसैनिक त्यांना भेटायला येऊ लागले.केलेली कामं,आंदोलन,कार्यक्रम इत्यादिच्या बातम्या आणि फोटो “सामना” मध्ये प्रसिद्धी देण्यासाठी आणून देत असतं.यात सामान्य शिवसैनिक ते शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकार्‍यांचा समावेश होता. कालांतराने शिवसैनिक व पदाधिकारी त्याच्या काही कुरबुरी,कामे,अडचणी उद्धवजींच्या समोर मांडू लागले. आम्हाला बाळासाहेबांना त्रास द्यायचा नाही,तुम्ही लक्ष घातलं तरी हा प्रश्न सुटेल असं म्हणत उद्धवजींना त्यांची कामं/कुरबुरी सांगायला लागले.उद्धवजी सुद्धा त्या सोडवू लागले.हे सगळं होतं असतानाच उद्धवजींना कार्यक्रमाची आमंत्रणे येऊ लागली.बाळासाहेबांचा व्याप पाहून वर्धापनदिन,पुजा तसेच इतर कार्यक्रमांची आमंत्रणं शिवसैनिक बाळासाहेबांना देण्याऐवजी उद्धवजींना देऊ लागले.

कार्यक्रमाला हजेरी लावण्याच आमंत्रण स्वीकारताना उद्धवजी आलेल्या शिवसैनिकाला “मी येईन, पण भाषण करणार नाही” अशी अट घालत असत. कार्यक्रम पार पडताच भाषण न करता “अर्जंट काम” असल्याच सांगत उद्धवजी तिथून निघत असत.काही दिवस गेल्यानंतर मात्र उद्धवजींच्या मनात विचार आला की आपण जे करतोय ते काही बरोबर नाही. आपल्याला लोक एवढ्या प्रेमाने बोलंवतात तर आपण जे काही असेल ते बोलावं. त्यानंतर उद्धवजींनी बाळासाहेब जे नेहमी बोलतं असत त्याप्रमाणे “जसं आहे तसं, कोणताही मुखवटा न लावता” भाषण करायला सुरुवात केली. “जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय” असं ठामपणे सांगत उद्धवजी सर्वांना सामोरे गेले. अशाप्रकारे उद्धवजी शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात व पर्यायाने राजकरणात  आले.

आज बाळासाहेबांच्या शैलीत नसलं तरी तितकच स्पष्ट,ठाम,मार्मिक,हजरजबाबी,संयमी आणि प्रसंगी आक्रमक अशा दोन्ही छटा असणारं वक्तृत्व उद्धवजींकडे आणि व बाळासाहेबांप्रमाणे आज उद्धवजी लाखोंच्या सभा व दसरा मेळावे गाजवत आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यात आणि शिवसैनिकांची मनं जिंकण्यात बाळासाहेबांची “स्टाईल” कॉपी न करता स्वतःची वक्तृत्वशैली निर्माण करणारे यशस्वी झाले आहेत.

Continue Reading

राजकीय

भाजपने युतीसाठी विनवण्या केल्या तर उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होणार?

Published

on

the-trumpet-of-the-lok-sabha-in-the-state-will-blow-uddh-to-this-day

मुंबई | शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजप दबाव टाकत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख हे एकला चलो रे या आपल्या भूमिकेला अनुसरून गुरुवारपासून लोकसभेचे रणशिंग फुंकण्यास सज्ज झाले आहेत. गुरुवारी मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रथम रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार महाड येथील भिलारे मैदानात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जागा शिवसेनेची असून अनंत गिते येथून खासदार आहेत. केंद्रात ते मंत्रिपदावरही आहेत. दुसरी सभा मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील पोलिस मैदानावर दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत.

शिवसेनेतील सूत्रांनी माहिती देताना सांगितले, भाजपने युतीसाठी कितीही विनवण्या केल्या तरी उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होणार नाहीत. भाजपने मागील विधानसभेच्या वेळेला केलेली दगाबाजी आम्ही विसरू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सर्वच्या सर्व म्हणजे ४८ मतदारसंघात उमेदवार दिले जाणार आहेत. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार सक्षम नसेल तेथे पर्याय शोधला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. ५०-५० टक्के जागा भाजपने दिल्या तर शिवसेना युतीसाठी तयार होईल का, असा प्रश्न शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला विचारला असता त्यांनी सांगितले, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. मात्र, मागील अपमान आम्ही विसरणार नाही.

४८ मतदारसंघात सभा घोणर : मुख्यमंत्री

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ४८ लोकसभा मतदारसंघात सभा घेणार असल्याचे सांगितले. एकीकडे युती व्हावी असे बोलतात आणि दुसरीकडे सर्व लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार, असे कसे असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले, मागील वेळी युती असतानाही मी दौरे केले होते तसेच आत्ताही करणार आहे. युती झाली तर दोघांनाही फायदा होईल त्यामुळे मी सर्व लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार त्यात नवीन आणि वेगळे काही नाही असे स्पष्ट केले. दरम्यान, यामुळे भाजप व शिवसेनेत नव्याने संघर्ष होण्याची शक्यता आहे.

५०-५० वर जागा वाटप होऊ शकते ? 

शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेत लोकसभा निवडणुकीची सविस्तर चर्चा झाली आणि त्याचे प्राथमिक नियोजनही करण्यात आले होते. भाजपबरोबर शिवसेनेची युती ५०-५० टक्के जागा वाटपावर होऊ शकते. आता ज्या जागा ज्या पक्षाने जिंकल्या आहेत त्या त्यांच्याकडेच ठेवून शिवसेना जेथे दुसऱ्या क्रमांकावर होती त्या जागा शिवसेनेला दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव भाजपला दिला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Continue Reading

राजकीय

१५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला तरी शंभरावर तालुके दुष्काळापासून वंचित राहणार | धनंजय मुंडे

Published

on

मुंबई | राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार १८० तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले असताना सरकारने १५१ तालुक्यामध्येच दुष्काळ जाहीर केला असून, वगळलेले २९ तालुके कोणत्या निकषाआधारे वगळले ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला असून, हे केवळ २९ नव्हे तर शंरभरावर तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहणार असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने आज १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याबद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना धनंजय मुंडे म्हणाले की, राज्य सरकारने आधी केंद्राचे पथक त्यांची पाहणी झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करू अशी वेळ काढुपणाची भूमिका घेतली होती. मात्र राज्यातील दुष्काळी भागातील जनता, विरोधी पक्षांची सातत्यपुर्ण मागणी व माध्यमांच्या वस्तुस्थितीदर्शक दबावामुळेच सरकारला अखेर दुष्काळ जाहीर करावा लागला आहे. हा दुष्काळ जाहीर करताना वर उल्लेख केल्याप्रमाणे २९ तालुके तर वगळल्या गेलीच आहेत, त्याचबरोबर केंद्रीय दुष्काळी संहिता २०१६ च्या चुकीच्या निेेकषामुळे अनेक तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे आम्ही पत्रकार परिषद घेऊन निदर्शनास आणुन दिले होते. सरकारमधीलच एक मंत्री बबनराव लोणीकर यांनीही मोदी सॅटेलाईटमुळे अनेक तालुके दुष्काळमुळे वगळले गेले असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे राज्यातील शंभरावर तालुक्यातील जनतेला दुष्काळी मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.

दुष्काळी भागातील जनतेचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने तातडीने रोजगार हमी योजनेचे कामे सूरू करावीत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे केवळ परिक्षा शुल्क माफ न करता संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, २०१३-१४ च्या नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकारने एनडीआरएफचे निकष बाजुला घेऊन हेक्टरी २५ हजार रूपये मदत दिली होती, यावेळचा अभूतपवूर्व दुष्काळ असल्याने हेक्टरी ५० हजार रू. मदत द्यावी, दुष्काळी भागात तातडीने जनावरांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या मुंडे यांनी केल्या आहेत.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक7 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited