Connect with us

देश

मोदीसरकारकडून जनतेला महागाईची दिवाळीभेट !

Published

on

Narendra Modi Gas Cylendar

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर अल्पप्रमाणात का होईना कमी होत आहेत. त्यातून काही प्रमाणात दिलासा मिळत असताना केंद्रसरकारने गॅस सिलिंडरच्या दरात सलग सातव्यांदा वाढ केल्यामुळे ऐन दिवाळीत जनतेचं कंबरड मोडलं आहे. नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही ५९ रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात २.९४ पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे.

नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ८८० रुपये असेल. विशेष म्हणजे अनुदानित सिलिंडरवर देण्यात येणारी सूट सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांच्या खात्यात ४३३.६६ रुपये जमा होतील. तर ऑक्टोबर २०१८ मध्ये ही रक्कम ३७६.८० पैसे इतकी होती. इंडियन ऑइलने सप्टेंबरमध्ये निवेदन प्रसिद्ध केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्यामुळे आणि विदेशी मुद्रा विनिमय दरातील चढ-उतार हे सिलिंडरच्या दर वाढीस कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

  • विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपये
  • तर अनुदानित सिलिंडरच्या दरात २ रु. ९४ पैशांची वाढ
  • सलग सातव्यांदा गॅस सिलिंडर दरात वाढ

आजचे गॅस सिलिंडरचे दर

  1. हिंदूस्थान पेट्रोलियम (एचपी)      अनुदानित ४८४ रुपये, विनाअनुदानित ८७१.५० रु.
  2. भारत गॅस                                   अनुदानित ४८४.५० रु, विनाअनुदानित ८७२ रु.
  3. इंडेन गॅस                                    अनुदानित ४८५ रु.,विनाअनुदानित ८७२ रु.

देश

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Published

on

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area

बंगळुरू | कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची  भीती व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरूतल्या त्यागराज नगर क्षेत्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीत काम सुरू असतानाच ती अचानक कोसळली, त्यामुळे इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अद्यापही कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. सध्या तरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य राबवलं जात आहे.

Continue Reading

देश

देशामध्ये जे माझ्याप्रमाणे विवाह करणार नाही, त्यांचा विशेष सन्मान करायला हवा | रामदेव बाबा

Published

on

Baba Ramdev for Ram temple through legislation

हरिद्वार | योग गुरू बाबा रामदेव पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘जी लोक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील, त्यांना मतदानाचा अधिकार नसावा’, असेमत बाबा रामदेव यांनी मांडले आहे. शिवाय, माझ्याप्रमाणे जी लोक लग्न करणार नाहीत, त्यांना समाजात विशेष सन्मान मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमाला बाबा रामदेव संबोधित करत होते.

नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? 
या देशामध्ये जे माझ्याप्रमाणे विवाह करणार नाही, त्यांचा विशेष सन्मान करायला हवा. पण लग्न केल्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा. पुरातन काळात लोकसंख्या कमी होती, या पार्श्वभूमीवर वेदांमध्ये 10-10 अपत्यांना जन्म देण्यास सांगितले गेले आहे. आता ज्यांचं सामर्थ्य आहे, त्यांनी करावं. पण आता तशीही देशाची लोकसंख्या 125 कोटी एवढी आहे. मात्र जर कोणी बुद्धिमान पुरुष किंवा स्त्री आहे आणि जर ते पूर्णतः जागृत आत्मा असतील तर ते एकटेच हजारो, लाखो, कोट्यवधींवर भारी पडतात, ही भारतीय ज्ञानाची परंपरा आहे.

Continue Reading

देश

राम मंदिराच्या निर्मीतीसाठी या दिवाळीत एक दिवा रामाच्या नावे

Published

on

yogi-adityanath

राजस्थान | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माद्यमातून सांगितले कि अयोध्येतील राम मंदिराचे काम लवकरच सुरू होईल पण त्यासाठी प्रत्येक नागरिकाने राम मंदिराच्या निर्मीतीसाठी या दिवाळीत एक दिवा रामाच्या नावे लावावा, असे आवाहन राजस्थानमध्ये शनिवार निवडणूक प्रचार रॅलीवेळी केले.

राजस्थानमधील बीकानेर येथे आयोजीत निवडणूक प्रचार रॅलीवेळी, देशातील धर्मस्थळे ही उपासना करण्याचे ठिकाण नसून ते एकात्मता निर्मितीची आहेत. यासाठी देशातील धर्मस्थळे प्रत्येक नागरिकांसाठी खुली असली पाहिजेत. असे करणे ही आजची काळाची गरज आहे. असे ते म्हणाले. यावेळी योगी यांनी बीकानेरच्या श्रीनवलेश्वर सिद्धपीठ मठात योगी श्रीमत्स्येंद्रनाथ, योगी गुरु गोरक्षनाथ आणि भगवान आदित्यदेव यांच्या प्रतिमांचे अनावरण केले.

यावेळी, आयोध्येत राम मंदिर बांधणे हे आपले स्वप्न आहे तर आयोध्येत झालेल्या राम जन्मभूमी आंदोलनात मी सक्रिय होते. यासंदर्भात माझ्यावर आजही खटला सुरू असून त्याचा मला गर्व आहे. असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सांगितले

Continue Reading

देश

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजीनामा दिल्यास मोदी सरकारच्या अडचणी वाढतील

Published

on

If the Governor of the Reserve Bank resigns, the problems of the Narendra Modi government may increase

स्वायत्ततेच्या प्रश्नावरून रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान तणाव वाढला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधला होता. २००८ ते २०१४ दरम्यान, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती. बँकिंग व्यवस्थेतील आजच्या बुडीत कर्जाच्या समस्येचेही खापरही त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेवर फोडले होते.

तर त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात सरकारवर टीका केली होती. यावरुन आरबीआय आणि केंद्र सरकारमधील संबंध तणाव असल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर बुधवारी गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. उर्जित पटेल हे सरकारच्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे वृत्त ‘सीएनबीसी टीव्ही १८’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. उर्जित पटेल यांनी तणावाच्या पार्श्वभूमीवर राजीनाम्यासह सर्व पर्याय खुले ठेवल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तर मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने उर्जित पटेल हे राजीनामा देणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, अद्याप रिझर्व्ह बँकेच्या वतीने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Continue Reading

देश

‘Statue of Unity’ inauguration: पंतप्रधान मोदी केवडियात पोहोचले, थोड्याच वेळात लोकार्पण

Published

on

statue of unity inauguration live pm modi reaches kevadiya to shortly unveil worlds largest statue

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे.या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल. भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून मागील काही महिन्यांपासून हा पुतळा चांगलाच चर्चेत आहे. या पुतळ्याचे एक मराठी कनेक्शनही आहे. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषही म्हटलं जातं आज लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण याच मुद्द्यांवर केंद्रीत असेल ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.

Continue Reading

देश

हिंदू धर्म भाजपपेक्षा मला अधिक समजतो | राहुल गांधी

Published

on

Rahul Gandhi To Address Rallies In Madhya Pradesh Today

इंदूर | जग समजण्यासाठी तुमच्याकडे केवळ एक गुण असावा तो म्हणजे मानवता होय. कोणी तुमच्यावर रागवले तरी तुम्हाला ते समजून घेता आला पाहिजे आणि भाजपपेक्षा मला हिंदू धर्म अधिक चांगला समजतो, असे सडेतोड उत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिले आहे.भाजपने राहुल गांधी यांचे गोत्र कोणते, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला गांधी यांनी दिलेले हे उत्तर मानण्यात येते.

इंदूर येथे राहुल गांधी यांनी लहान मुलांसोबत आईस्क्रीमचा आनंदही लुटला. त्यानंतर त्यांनी धार येथे एका सभेला संबोधित केले. शेतक-यांच्या मालाला किमान भावही मिळत नसल्याने शेतक-यांना आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारावा लागत असून त्यांची स्थिती विदारक होत चालल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतक-यांच्या या अवस्थेला सरकारची धोरणेच जबाबदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

शेतक-यांच्या स्थितीची मांडणी करताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जोरदार हल्ला चढवला. त्यांनी यासाठी काही उदाहरणेही दिली. ते म्हणाले, एक किलो बटाट्यासाठी शेतक-याला पाच रुपयेही मिळत नसताना बटाट्याच्या चिप्सचे पाकीट मात्र पाच रुपयांना विकले जाते. हे पाकीट केवळ एका बटाट्यापासून बनते. म्हणजेच या बटाटा चिप्सच्या पाकीटाचा उत्पादन खर्च किती कमी असतो. पण शेतक-यांच्या वाट्याला यातील पन्नास पैसेही येत नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या स्थितीची कल्पना तुम्हाला येऊ शकते. आम्हाला शेतक-यांच्या स्थितीची कल्पना असून केवळ काँग्रेस पक्षच शेतक-यांचे प्रश्न सोडवू शकतो. सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अधिकच रसातळाला चालला असल्याची टीका त्यांनी केली. व्यापम घोटाळा आणि पनामा पेपर्सचा उल्लेख करत त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह-चौहान यांच्यावरही हल्ला चढवला.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited