Connect with us

मुंबई पुणे नाशिक

कायद्यातील तरतुदींचा केला दुरुपयोग

Published

on

मुंबई : अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेता हजारो शिक्षकांची थेट भरती करण्याचे गेली अनेक वर्षे राज्यात सुरू असलेले रॅकेट उच्च न्यायालयात केल्या गेलेल्या एका जनहित याचिकेने उघड झाले आहे. न्यायालयाने त्याविषयी तीव्र चिंता व्यक्त करून शालेय शिक्षम विभागाच्या प्रधान सचिवांना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

हा गैरप्रकार २०११-१२ पासून सुरू असून, त्यात शाळांचे चालक व शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे संगनमत आहे. परिणामी अतिरिक्त ठरलेल्या हजारो शिक्षकांना घरी बसून पगार व त्याऐवजी थेट भरतीच्या शिक्षकांनाही वेतन अशा दुहेरी भुर्दंडामुळे राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी काहीशे कोटी नाहक खर्च होत आहेत.

विजय महेश गुप्ता यांनी नागपूर खंडपीठाकडे जनहित याचिका करून हा विषय आणला आहे. त्यातील माहितीची दखल घेत शासनाच्या पैशांचा असा अपव्यय होत असूनही जबाबदार सनदी अधिकाऱ्यांनी त्याकडे काणाडोळा करावा, याविषयी न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
सरकारच्या आकडेवारीच्या आधारे न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात नमूद केले की, २०१५-१६ पर्यंत ७,११४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यावर्षी या कर्मचाºयांना सामावून घेण्याची आॅनलाइन प्रक्रिया राबविली. त्यात २,८०९ कर्मचारी सामावून घेतले व ४,३०५ जणांना सामावून घेता आले नाही.

वर्ष २०१६-१७ मध्ये ४,३१७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यापैकी १,९२३ जणाचे समायोजन झाले व २,३९४ जणांचे होऊ शकले नाही. समायोजन न झालेल्या शिक्षकांना घरी बसून पूर्ण पगार मिळतो, हेही सरकार मान्य करते. त्यामुळे २०११-१२ पासून दरवर्षी किमान २,५०० अतिरिक्त शिक्षकांना नेमणुका न देता पगार मिळत आहे आणि दुसरीकडे शिक्षकांची थेट भरतीही केली जात आहे.

न्यायालयाने नमूद केले की, सरकार या प्रकाराचे खापर शिक्षणाधिकाऱ्यांर फोडते. पण एकाही शिक्षणाधिकाºयाविरुद्ध वा शाळांच्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई झालेली नाही. थेट नेमलेल्या शिक्षकांच्या पदांना दीर्घकाळ मंजुरी मिळत नाही किंवा मंजुरी काही वर्षांनी रद्द केली जाते. असे शिक्षक न्यायालयात येतात व त्यांना नोकरीत ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले जातात.

कायद्यातील तरतुदींचा केला दुरुपयोग
न्यायालय म्हणते की, विद्यार्थींसंख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना कामावरून कमी न करता अतिरिक्त मानायचे व त्यांचे अन्यत्र समायोजन होईपर्यंत त्यांना पगार देत राहायचा हा नियम कल्याणकारी हेतूने केला.
परंतु शाळांचे चालक व शिक्षण विभागातील अधिकारी मिळून या तरतुदीचा गैरफायदा घेऊन सरकारचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान करत असल्याचे दिसते.

मुंबई पुणे नाशिक

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

Published

on

Six men arrested with twelve women

उल्हासनगर | गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेहरू चौकात आँर्केस्टाच्या नावाखाली स्प्रिंग व्हॅली या डान्स बार वर धाड मारली,या वेळी पोलिसांनी डम्मी ग्राहक पाठवून ,या बार मध्ये काही महिला “कुंडी मत सरकाव राजा ,सिधा अंदर आओ राजा “या हिंदी गाण्यावर अश्लील नृत्य करत असल्याची माहिती मिळाल्यावर बार मध्ये धाड मारली ,या कारवाईत बारा महिला बारबाला ,सात बार मधील कर्मचारी आणि नऊ बार मध्ये बसलेले ग्राहक असे एकूण 28 जणांना अटक केली.

या सर्व आरोपीन विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागाने भा.द.वि कलम 294 आणि 34 अंतर्गत कारवाई केली आहे,हा बार धरु बार या नावाने प्रसिद्ध असून काही दिवसानंपूर्वी या बार मध्ये रात्री हत्या झाल्यानंतर या बार चे लायसन्स रद्द झाले होते ,मात्र काही दिवसानंतर स्प्रिंग व्हॅली या नावाने ऑर्केस्ट्रा बार च्या नावाखाली डान्स बार सुरू केलाय, या बारचा आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून,काल झालेल्या पोलिसांच्या कारवाई नंतर नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

@गौतम वाघ

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Published

on

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane

ठाण्यातील तलावाच्या काठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य नेण्यास बंदी आहे. मग छटपूजेला तलावाकाठी निर्माल्य नेण्यास कशी परवानगी दिली जाते? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. छटपूजेला परवानगी दिल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस घाणीचे साम्राज्य पसरते. त्याला जबाबदार कोण? असे म्हणत मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane

उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येणारी छटपूजा येत्या १३ नोव्हेंबरला आहे. गणेशोत्सवाच्या वेळी होणारे प्रदूषण छटपूजेमुळे होत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केल्याने ठाण्यात राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वाना सारखे नियम लागू न केल्यामुळे ‘मनसे’ आक्रमक झाली आहे. त्यामुळे छटपूजेच्या दिवशी मनसे कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Published

on

Diwali-in-Pune

पुणे | हेल्मेट सक्ती असो, किंवा फटाक्यांवरील निर्बंध, पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात हे पुन्हा एकदा समोर आलंय. वाहनांच्या वाढत्या संख्येने पुण्याचं प्रदूषण धोक्याच्या उंबरठ्यावर असताना त्यात आणखी भर पाडली आहे. पुणेकरांनी दिवाळीत केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी पुणेकरांनी सर्वाधिक फटके वाजवल्याने शहर अतिप्रदूषित झाल्याचं समोर आलंय.

पुणेकर स्वतःचे नियम स्वतःच ठरवतात, असं गमतीने म्हटलं जातं. मात्र हेच म्हणणं खरं ठरलंय. पुणेकरांनी उडवलेल्या फटाक्यांमुळे लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी झालेलं प्रदूषण ‘अतिप्रदूषित’ या वर्गात मोडणारं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने बंधन घालूनही पुणेकर मात्र निर्बंध राहिले.

सफर विभागाच्या नोंदीनुसार सोमवार ते शनिवार या कालावधीत पुण्यात हवेची सरासरी गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र, लक्ष्मीपूजनाची रात्र आणि पाडव्याची पहाट या दरम्यान हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात फटाक्यांच्या विक्रीवर झालेला परिणाम आणि त्यामुळे पहिल्या दिवशी फटाक्यांचा आवाज बंद झाल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाल्याचे दिसून येत असतानाच, लक्ष्मीपूजनादिवशी मात्र जोरदार फटाकेबाजी झाल्याने प्रदूषणाचे गेल्यावर्षीचे रेकॉर्डही मोडीत निघाले.

यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास घातलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झाला. फटाके विक्री आणि फटाके फोडण्याच्या संख्येतही घट नोंदविली गेली. मात्र यामुळे प्रत्यक्षात वायू प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा असताना, ते गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्याचं दिसून आलं. तर इतर दिवशी ते गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र बर्‍याच प्रमाणात कमी आढळून आलं. सफर – इंडिया या संस्थेने केलेल्या चाचणीत ही माहिती समोर आली आहे.

प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि विविध संस्थांनी फटाके वाजवूच नये, यासाठी मोहिम हाती घेतली.मात्र याचा फारसा परिणाम पुणेकरांवर झाला नाही. आधीच वाहनांच्या प्रदूषणामुळे पुण्याची हवा प्रदूषित झालीय. त्यात फटाक्याबाबतही पुणेकरांनी आघाडी घेतल्याने पुण्याची दिल्ली व्हायला, फारसा वेळ लागणार नाही.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Published

on

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar

मुंबई | मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर आले आहेत. ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला कल्याणमधील सिनेमॅक्स, पीव्हिआर चित्रपटगृहात एक शो दिल्याने मनसेने शनिवारी सकाळी मल्टिप्लेक्सवाल्यांची कानउघडणी करत प्राईम टाईम शो देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मल्टिप्लेक्सवाल्यांनी ही मागणी मान्य केली आहे. ‘डॉ.काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे दिवसाला ४ शो देणार असल्याचे आश्वासन मनसेला देण्यात आले आहे. पीव्हिआर चित्रपटगृहात दुपारी १२:३०, ३:०० आणि सायंकाळी ६:३०, १०:०० वाजताचे शो देण्यात आले आहेत.

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे एकच शो ठेवण्यात आले आहेत. मराठी चित्रपटांना डावलत हिंदी चित्रपटांना प्राईम टाईम शो देण्याचा मल्टिप्लेक्सवाल्यांचा मनमानी कारभार आधीपासून चालू आहे. बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाला एक शो देत ठग्ज आॅफ हिंदुस्थान चित्रपटाला जास्त शो देण्यात आले असल्याचे मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी प्रहार वेब टीमशी बोलताना सांगितले. मनसेद्वारे मल्टिप्लेक्सवाल्यांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मागणी मान्य न केल्यास ठग्ज आॅफ हिंदुस्थानचा एकही शो चालू देणार नाही तसेच मल्टिप्लेक्सवाल्यांना मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशारा कौस्तुभ यांनी दिला होता.

कल्याण भागात मल्टिप्लेक्समध्ये ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटगृहाला अधीक शो देण्याची मागणी मान्य झाली असली तरी शहरातील इतर मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे एकच शो आहेत. मल्टिप्लेक्सवाल्यांकडून मराठी चित्रपटांना डावलून हिंदी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येत आहे. हे सहन केले जाणार नाही. येत्या २४ तासात ‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला जास्त शो न दिल्यास मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपरकर यांनी दिला आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सुप्रिम कोर्टच्या आणि पोलीस आयुक्तच्या आदेशाला केराची टोपली

Published

on

उल्हासनगर | उल्हासनगर अस शहर आहे “या शहरात कुछ भी हो सकता है” उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दितील नेहरू चौकात गजानन मार्केट या ठिकाणी हजारो ग्राहक विविध खरेदीसाठी येत असतात मात्र हा चौक धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे.

या चौकात तीन मोठं मोठे फटाक्याचे दुकानं दिवाळी निम्मित उभारलेली दिसून येत आहेत. या फटाक्यांच्या दुकानाचे दोन दोन मजले फटाक्यांने भरले आहेत. या व्यापाऱ्यांनी पोलीसांच्या सर्व नियमांना धाब्यावर ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पोलीस ह्या वरती कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. या फटाका व्यापाऱ्यानी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून जारी केलेले कोणतेही आदेश पाळले नसल्याचे दिसून येत आहे या शहरात आयुक्तालयाकडून 12 फटाके विक्रेत्यांना रितसर परवानगी दिली असली तरी नेहरू चौकातील 10 ते 12 दुकानांमध्ये फक्त मोजून तीन ते चार दुकानांकडे पोलीस आयुक्तांची फटाके परवानगी परवाना आहे.

चौकात फटाक्यांच्या कोणत्याही दुकानात काही घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहचू शकत नाही अशी परिस्तिथी आहे त्यामुळे मोठी वित्तहानी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान माननीय सुप्रीम कोर्टाने फटाक्याबाबत जे आदेश दिले आहेत ते या दुकानदारांन प्रयन्त पोहचले नसल्याचे ह्याच्या उभारलेल्या दुकानावरून दिसून येत आहे या दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे फटाके सर्रास पणे विकले जात आहेत.

तसेच इतर आदेशांचे नियमांचे कोणतेही पालन या दुकानांमध्ये केले जात नाही तरी पोलीस प्रदूषण महामंडळ शासनाचे स्फोटक विभाग हे सर्व विभागानी या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करत आहे या विभागात एखादी मोठी घटना घडल्यास त्याला जवाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

@गौतम वाघ

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागतोय?

Published

on

मुंबई | रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन कठोर पावले उचलत नसल्याचे दिसून आले आहे.

मध्य रेल्वेच्या वर्कशॉपमधील टाईप वन क्वार्टर धोकादायक अवस्थेत आहे. असे असताना या क्वार्टरमध्ये अनेक रेल्वे कर्मचारी वास्तव्यास आहेत. अशा क्वार्टरमध्ये दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

मध्य रेल्वे वर्कशॉपमधील टाईप वन क्वार्टरमध्ये राहणा-या आनंदमोहन शर्मा या कर्मचा-र्याने ही बाब समोर आणली आहे. IOW व्यवस्थापनेकडून टाईप वन क्वार्टर धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे आपण राहत असलेली जागा राहण्यास योग्य नसून आपले स्थलांतर करावे याबाबतचे पत्र शर्मा यांनी रेल्वे व्यवस्थापकांना लिहिले आहे. घराचे छत ही अनेकदा कोसळले आहे. त्याची दुरूस्ती करण्यात आली. परंतु अशा क्वार्टरमध्ये राहणे धोकादायक असल्याचे शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.

RB3 येथील क्वार्टर रिकामे असून या ठिकाणी आपले स्थंलातर करावे अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. आपण वास्तव्यास असलेले ठिकाण धोकादायक असल्याचे शर्मा यांनी अनेकदा रेल्वे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. धोकादायक घोषित केलेल्या क्वार्टरमध्ये दुर्घटना झाल्यास अनेक कर्मचा-यांचा जीव जाऊ शकतो, असे झाल्यास रेल्वे प्रशासन, पालिका आपत्कालीन कक्ष, पोलिस याची जबाबदारी घेतील का? असा सवाल गलगली यांनी केला आहे.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक7 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited