Connect with us

मुंबई पुणे नाशिक

शिवरायांचा पुतळा जगविख्यात घुमटात बसविण्यासाठी ठिय्या आंदोलन

Published

on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जगविख्यात घुमटात बसविण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार ३० ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवराय सन्मान कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विकास लवांडे यांनी दिली.

लोणी काळभोर येथे एम.आय.टी. या संस्थेने उभारलेल्या जगविख्यात घुमटात विविध क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या ५२ महान व्यक्तींचे पुतळे आहेत. पण महाराष्ट्रात असलेल्या या घुमटात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला नाही. या घुमटात पुतळा बसवावा अशी मागणी अनेकदा करण्यात येवून सुध्दा एम.आय.टी. संस्था व विश्वनाथ कराड यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मंगळवार ३० ऑक्टोबर रोजी सर्व जाती धर्मीय आणि सर्व पक्षीय शिवप्रेमींनी एम.आय.टी. संस्थेसमोर करण्यात येणा-या ठिय्या आंदोलनात सकाळी १० ते ५ शांततेत सहभागी व्हावे असे आवाहन विकास लवांडे यांनी केले आहे.

प्रत्येकाने शिवछत्रपतींच्या सन्मानासाठी एक दिवस द्यावा. राज्यातील कोणत्याही सच्चा शिवप्रेमीने यापुढे गप्प बसून चालणार नाही. अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा प्रश्न केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून जागतिक मांदियाळीत छत्रपती का नाहीत? हा छत्रपतींचा अवमान नाही काय? छञपती शिवाजी महाराजांच्या बाबत एम.आय.टी. संस्थेला इतका तिरस्कार का वाटतोय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणण्याचा आहे. एम.आय.टी. च्या अशा वागण्याचा आम्ही निषेध करत आहोत. तरी सर्वांनी या ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती शिवराय सन्मान कृती समितीने केले आहे

Advertisement 585857
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मुंबई पुणे नाशिक

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

Published

on

Six men arrested with twelve women

उल्हासनगर | गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेहरू चौकात आँर्केस्टाच्या नावाखाली स्प्रिंग व्हॅली या डान्स बार वर धाड मारली,या वेळी पोलिसांनी डम्मी ग्राहक पाठवून ,या बार मध्ये काही महिला “कुंडी मत सरकाव राजा ,सिधा अंदर आओ राजा “या हिंदी गाण्यावर अश्लील नृत्य करत असल्याची माहिती मिळाल्यावर बार मध्ये धाड मारली ,या कारवाईत बारा महिला बारबाला ,सात बार मधील कर्मचारी आणि नऊ बार मध्ये बसलेले ग्राहक असे एकूण 28 जणांना अटक केली.

या सर्व आरोपीन विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागाने भा.द.वि कलम 294 आणि 34 अंतर्गत कारवाई केली आहे,हा बार धरु बार या नावाने प्रसिद्ध असून काही दिवसानंपूर्वी या बार मध्ये रात्री हत्या झाल्यानंतर या बार चे लायसन्स रद्द झाले होते ,मात्र काही दिवसानंतर स्प्रिंग व्हॅली या नावाने ऑर्केस्ट्रा बार च्या नावाखाली डान्स बार सुरू केलाय, या बारचा आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून,काल झालेल्या पोलिसांच्या कारवाई नंतर नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

@गौतम वाघ

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Published

on

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane

ठाण्यातील तलावाच्या काठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य नेण्यास बंदी आहे. मग छटपूजेला तलावाकाठी निर्माल्य नेण्यास कशी परवानगी दिली जाते? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. छटपूजेला परवानगी दिल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस घाणीचे साम्राज्य पसरते. त्याला जबाबदार कोण? असे म्हणत मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane

उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येणारी छटपूजा येत्या १३ नोव्हेंबरला आहे. गणेशोत्सवाच्या वेळी होणारे प्रदूषण छटपूजेमुळे होत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केल्याने ठाण्यात राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वाना सारखे नियम लागू न केल्यामुळे ‘मनसे’ आक्रमक झाली आहे. त्यामुळे छटपूजेच्या दिवशी मनसे कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Published

on

Diwali-in-Pune

पुणे | हेल्मेट सक्ती असो, किंवा फटाक्यांवरील निर्बंध, पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात हे पुन्हा एकदा समोर आलंय. वाहनांच्या वाढत्या संख्येने पुण्याचं प्रदूषण धोक्याच्या उंबरठ्यावर असताना त्यात आणखी भर पाडली आहे. पुणेकरांनी दिवाळीत केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी पुणेकरांनी सर्वाधिक फटके वाजवल्याने शहर अतिप्रदूषित झाल्याचं समोर आलंय.

पुणेकर स्वतःचे नियम स्वतःच ठरवतात, असं गमतीने म्हटलं जातं. मात्र हेच म्हणणं खरं ठरलंय. पुणेकरांनी उडवलेल्या फटाक्यांमुळे लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी झालेलं प्रदूषण ‘अतिप्रदूषित’ या वर्गात मोडणारं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने बंधन घालूनही पुणेकर मात्र निर्बंध राहिले.

सफर विभागाच्या नोंदीनुसार सोमवार ते शनिवार या कालावधीत पुण्यात हवेची सरासरी गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र, लक्ष्मीपूजनाची रात्र आणि पाडव्याची पहाट या दरम्यान हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात फटाक्यांच्या विक्रीवर झालेला परिणाम आणि त्यामुळे पहिल्या दिवशी फटाक्यांचा आवाज बंद झाल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी झाल्याचे दिसून येत असतानाच, लक्ष्मीपूजनादिवशी मात्र जोरदार फटाकेबाजी झाल्याने प्रदूषणाचे गेल्यावर्षीचे रेकॉर्डही मोडीत निघाले.

यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास घातलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झाला. फटाके विक्री आणि फटाके फोडण्याच्या संख्येतही घट नोंदविली गेली. मात्र यामुळे प्रत्यक्षात वायू प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा असताना, ते गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्याचं दिसून आलं. तर इतर दिवशी ते गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र बर्‍याच प्रमाणात कमी आढळून आलं. सफर – इंडिया या संस्थेने केलेल्या चाचणीत ही माहिती समोर आली आहे.

प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि विविध संस्थांनी फटाके वाजवूच नये, यासाठी मोहिम हाती घेतली.मात्र याचा फारसा परिणाम पुणेकरांवर झाला नाही. आधीच वाहनांच्या प्रदूषणामुळे पुण्याची हवा प्रदूषित झालीय. त्यात फटाक्याबाबतही पुणेकरांनी आघाडी घेतल्याने पुण्याची दिल्ली व्हायला, फारसा वेळ लागणार नाही.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Published

on

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar

मुंबई | मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर आले आहेत. ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला कल्याणमधील सिनेमॅक्स, पीव्हिआर चित्रपटगृहात एक शो दिल्याने मनसेने शनिवारी सकाळी मल्टिप्लेक्सवाल्यांची कानउघडणी करत प्राईम टाईम शो देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मल्टिप्लेक्सवाल्यांनी ही मागणी मान्य केली आहे. ‘डॉ.काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे दिवसाला ४ शो देणार असल्याचे आश्वासन मनसेला देण्यात आले आहे. पीव्हिआर चित्रपटगृहात दुपारी १२:३०, ३:०० आणि सायंकाळी ६:३०, १०:०० वाजताचे शो देण्यात आले आहेत.

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे एकच शो ठेवण्यात आले आहेत. मराठी चित्रपटांना डावलत हिंदी चित्रपटांना प्राईम टाईम शो देण्याचा मल्टिप्लेक्सवाल्यांचा मनमानी कारभार आधीपासून चालू आहे. बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाला एक शो देत ठग्ज आॅफ हिंदुस्थान चित्रपटाला जास्त शो देण्यात आले असल्याचे मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी प्रहार वेब टीमशी बोलताना सांगितले. मनसेद्वारे मल्टिप्लेक्सवाल्यांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मागणी मान्य न केल्यास ठग्ज आॅफ हिंदुस्थानचा एकही शो चालू देणार नाही तसेच मल्टिप्लेक्सवाल्यांना मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशारा कौस्तुभ यांनी दिला होता.

कल्याण भागात मल्टिप्लेक्समध्ये ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटगृहाला अधीक शो देण्याची मागणी मान्य झाली असली तरी शहरातील इतर मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे एकच शो आहेत. मल्टिप्लेक्सवाल्यांकडून मराठी चित्रपटांना डावलून हिंदी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येत आहे. हे सहन केले जाणार नाही. येत्या २४ तासात ‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला जास्त शो न दिल्यास मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपरकर यांनी दिला आहे.

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

सुप्रिम कोर्टच्या आणि पोलीस आयुक्तच्या आदेशाला केराची टोपली

Published

on

उल्हासनगर | उल्हासनगर अस शहर आहे “या शहरात कुछ भी हो सकता है” उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दितील नेहरू चौकात गजानन मार्केट या ठिकाणी हजारो ग्राहक विविध खरेदीसाठी येत असतात मात्र हा चौक धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे.

या चौकात तीन मोठं मोठे फटाक्याचे दुकानं दिवाळी निम्मित उभारलेली दिसून येत आहेत. या फटाक्यांच्या दुकानाचे दोन दोन मजले फटाक्यांने भरले आहेत. या व्यापाऱ्यांनी पोलीसांच्या सर्व नियमांना धाब्यावर ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पोलीस ह्या वरती कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. या फटाका व्यापाऱ्यानी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून जारी केलेले कोणतेही आदेश पाळले नसल्याचे दिसून येत आहे या शहरात आयुक्तालयाकडून 12 फटाके विक्रेत्यांना रितसर परवानगी दिली असली तरी नेहरू चौकातील 10 ते 12 दुकानांमध्ये फक्त मोजून तीन ते चार दुकानांकडे पोलीस आयुक्तांची फटाके परवानगी परवाना आहे.

चौकात फटाक्यांच्या कोणत्याही दुकानात काही घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी वेळेवर पोहचू शकत नाही अशी परिस्तिथी आहे त्यामुळे मोठी वित्तहानी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान माननीय सुप्रीम कोर्टाने फटाक्याबाबत जे आदेश दिले आहेत ते या दुकानदारांन प्रयन्त पोहचले नसल्याचे ह्याच्या उभारलेल्या दुकानावरून दिसून येत आहे या दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे फटाके सर्रास पणे विकले जात आहेत.

तसेच इतर आदेशांचे नियमांचे कोणतेही पालन या दुकानांमध्ये केले जात नाही तरी पोलीस प्रदूषण महामंडळ शासनाचे स्फोटक विभाग हे सर्व विभागानी या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करत आहे या विभागात एखादी मोठी घटना घडल्यास त्याला जवाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

@गौतम वाघ

Continue Reading

मुंबई पुणे नाशिक

रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागतोय?

Published

on

मुंबई | रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन कठोर पावले उचलत नसल्याचे दिसून आले आहे.

मध्य रेल्वेच्या वर्कशॉपमधील टाईप वन क्वार्टर धोकादायक अवस्थेत आहे. असे असताना या क्वार्टरमध्ये अनेक रेल्वे कर्मचारी वास्तव्यास आहेत. अशा क्वार्टरमध्ये दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

मध्य रेल्वे वर्कशॉपमधील टाईप वन क्वार्टरमध्ये राहणा-या आनंदमोहन शर्मा या कर्मचा-र्याने ही बाब समोर आणली आहे. IOW व्यवस्थापनेकडून टाईप वन क्वार्टर धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे आपण राहत असलेली जागा राहण्यास योग्य नसून आपले स्थलांतर करावे याबाबतचे पत्र शर्मा यांनी रेल्वे व्यवस्थापकांना लिहिले आहे. घराचे छत ही अनेकदा कोसळले आहे. त्याची दुरूस्ती करण्यात आली. परंतु अशा क्वार्टरमध्ये राहणे धोकादायक असल्याचे शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.

RB3 येथील क्वार्टर रिकामे असून या ठिकाणी आपले स्थंलातर करावे अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. आपण वास्तव्यास असलेले ठिकाण धोकादायक असल्याचे शर्मा यांनी अनेकदा रेल्वे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. धोकादायक घोषित केलेल्या क्वार्टरमध्ये दुर्घटना झाल्यास अनेक कर्मचा-यांचा जीव जाऊ शकतो, असे झाल्यास रेल्वे प्रशासन, पालिका आपत्कालीन कक्ष, पोलिस याची जबाबदारी घेतील का? असा सवाल गलगली यांनी केला आहे.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited