Connect with us

महाराष्ट्र

धनगर आरक्षणाला उदयनराजेंचा पाठिंबा

Published

on

सातारा | छत्रपतींचे १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली आहे. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. मराठा, धनगर, मुस्लिम या समाजाच्या आरक्षणावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून सुरू केलेल्या लढ्यास आपला जाहीर पाठिंबा असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

महाराष्ट्र

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

Published

on

Uddhav Thackeray

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाडा विदर्भ भागातील शेतकरी कुटुंबाची या दुष्काळामुळे दयनीय अवस्था आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाच्या झळा शेतकरी कुटुंबाना बसत आहेत. अशा दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे.

अमरावती, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, अकोला, हिंगोली, जालना, बीड , लातूर, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद, आणि यवतमाळ येथील शेतकरी कुटुंबाना १५ किलो गहू आणि तांदूळ, पाच लिटर गोडेतेल, पाच किलो साखर, तीन किलो डाळ, दोन किलो रवा आणि मैदा, तीन किलो डालडा, उटणं आणि साबण अशा दिवाळी आणि गृहपयोगी वस्तू आज पाठवण्यात आल्या आहेत.

Continue Reading

महाराष्ट्र

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Published

on

Avni

मुंबई | अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. मनेका गांधी यांच्यानंतर आता काँग्रेस आणि शिवसेनेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. मुनगंटीवार यांना वाघ मारण्यात रस असून त्यांच्यात आणि शिकारी माफियांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. तर अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

निरूपम यांचा आरोप पाहता त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अवनी हत्येच्या निषेधार्थ ११ नोव्हेंबरला ग्लोबल मार्च काढण्यात येणार आहे. वरळी सीफेस ते शिवाजी पार्क मार्गावर मार्च काढण्यात येणार असून संजय निरूपम यामध्ये सहभागी होणार आहेत. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

राज्यात २००८ ते २०१५ या कालावधीत १४ वाघ मारण्यात आले. तर, २०१६ या वर्षात १६ वाघ मारण्यात आले असून २०१७ वर्षात २१ वाघ ठार करण्यात आल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. शिकारी माफिया सक्रिय असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुनगंटीवार आणि माफियांमध्ये साटंलोटं असल्याचं वक्तव्य निरूपम यांनी केलं. निरूपम यांच्या या आरोपाला मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले आहे. निरूपम यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Continue Reading

महाराष्ट्र

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Published

on

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde

अंबाजोगाई | राज्यात यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत देण्याची गरज आहे. ही मदत अधिवेशनापूर्वी न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

श्री.मुंडे मागील 4 दिवसांपासून दुष्काळी भागाचा दौरा, गावकर्‍यांशी चर्चा व शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी अंबाजोगाई तालुक्यताील घाटनांदुर व पट्टीवडगाव सर्कलमधील 42 पेक्षा जास्त गावांमधील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने हेक्टरी 25 हजार रूपये मदत दिली होती. यावेळी त्या वेळेपेक्षा यंदा अधिक बिकट परिस्थिती असल्याने यावेळी 50 हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलुन दाखवले. सदर मदत न मिळाल्यास अधिवेशन चालु न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मागच्या वर्षीचे बोंडअळीची नुकसान भरपाई, वीज बील माफ, 100 टक्के कर्जमाफीची अंमलबजावणी आणि मागेल तिथे टँकर, दावणीला चारा आदी मागण्याही त्यांनी केल्या. बीड जिल्हा बँक शेतकर्‍यांच्या पीक विम्याच्या पैशांवर व्याज खात आहे. त्यांची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी जेष्ठ नेते किसनराव बावणे, मजुर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, माऊली जाधव, शिवहार भताने, बाळासाहेब देशमुख, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, मच्छिंद्र वालेकर, मुस्ताक पटेल, पांडुतात्या हारे, शिवाजीराव सिरसाट, बळवंतराव बावणे, बालासाहेब राजमाने, गंडले साहेब, चंद्रकांत वाकडे, विश्वंभर फड, सत्यजित सिरसाठ, धनंजय शिंदे, चंद्रकांत चाटे, काशिनाथ कातकडे व परिसरातील सर्व सरपंच , घाटनांदुर येथील ग्रा.पं. सदस्य, शेतकरी , नागरिक आदी उपस्थित होते.

हातात जेवणाचे ताट अन दुष्काळ ग्रस्तांसोबत फराळ

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सध्या दिवाळीत घरी दिवाळी साजरी न करता दुष्काळ ग्रस्त भागात फिरत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत . एका एका दिवशी तब्बल 40 -40 गावांमधील नागरीकांशी सहा सहा तास व्यक्तीगत संवाद साधत आहेत . हे करतांना हातात ताट घेऊन जेवण आणि त्यांच्यासोबतच दिवाळी फराळ घेत आहेत.

Continue Reading

महाराष्ट्र

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Published

on

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death

सोलापुर | केवळ टॅ्रक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला म्हणुन ऊस तोड वाहतुक करणार्‍या मजुराला पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्या मजुराचा मृत्यु झाल्याची घटना काल माढा तालुक्यात घडली. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आक्रमक भुमिका घेतल्यामुळे अखेर त्या मारहाण करणार्‍या पोलिसां विरूध्द 302 चा गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? असा संतप्त सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. _

सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बबनरावजी शिंदे शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतुकीचे काम करणारा सोनगिरी ता.भुम, जि.उस्मानाबाद येथील प्रदिप कल्याण कुटे (वय 24) हा गरीब तरूण मजुर स्वतःच्या कुटुंबिया समवेत ऊसतोड करून तो स्वतःच्याच ट्रॅक्टरमधुन कारखान्याकडे घेवुन जात असतांना रविवार दि.04 नोव्हेंबर रोजी दुपारी मानेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दशरथ कुंभार व दिपक क्षिरसागर या दोघांनी त्यास ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला या क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यास माढा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा जागेवरच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.

सदर घटने प्रकरणी मयताच्या नातेवाईक व सोनगिरी ग्रामस्थांनी त्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करूनही पोलिस चाल ढकल करत होते. या घटनेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक, डि.वाय.एस.पी यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सोलापुर ग्रामीणच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करून त्या पोलिसां विरूध्द 302 चा गुन्हा दाखल करण्याची, त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः यात लक्ष घालुन  या दोन्ही पोलिसां विरूध्द 302 चा गुन्हा दाखल करण्याच्या सुचना माढा पोलिसांना दिल्याने या पोलिसां विरूध्द गुन्हा दाखल झाला असुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी ही मुंडे यांनी लावुन धरल्याने मयताचे पुन्हा सोलापुरच्या रूग्णालयात इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सोेमवारी सायंकाळ पर्यंत सुरु होती.

दरम्यान सदर घटनेबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असुन, रक्षणकर्ते पोलिसच ऊसतोड मजुरांच्या जिवावर का उठले आहेत असा संतप्त सवाल केला आहे. ऊसतोड मजुरांना सरकार कोणत्याही सोई-सवलती, सुविधा देत नाही. ऊस तोड कामगार महामंडळाचाही पत्ता नाही, या मजुरांना साधी सुरक्षाही मिळु नये आणि पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यु व्हावा ही अतिशय दुर्देवी घटना असुन ऊस तोड मजुरांवर होणार्‍या या अन्यायाबद्दल आपण सरकारला जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले. या पोलिसांनी आवाज वाढवला म्हणुन नव्हे तर हप्ता वसुलीसाठी या मजुराच्या वाहनाला आडवले असा आरोप करून हा हप्ता त्या पोलिसांसाठी होता का ? वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसाठी असा सवाल उपस्थित करून या प्रकरणी अधिक सखोल चौकशी करून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.

Continue Reading

महाराष्ट्र

साहेब,अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय! पाठवू का?

Published

on

Raj Thackeray Targets to Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीतून निशाणा साधला आहे. आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे.  याचाच संदर्भ घेत राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यावर टीका केली आहे. या चित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान,एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की,  साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ‘धुवायला’ आलाय, पाठवू का?. तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.

एकूणच, राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

#Diwali2018 #RTist #RajThackeray #cartoons #दिवाळी #Abhyangasnan #Maharashtra #devendrafadnvis

Posted by Raj Thackeray on Monday, November 5, 2018

Continue Reading

महाराष्ट्र

सरकारच्या नाकर्तेपणाची 4 वर्षे ; परळीत राष्ट्रवादीचा होर्डिंग्जद्वारे हल्लाबोल!

Published

on

परळी वैजनाथ | केंद्रातील एनडीए सरकारला साडेचार वर्षे तर राज्यातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु या कालावधीत जनतेच्या नशिबी घोर निराशेशिवाय दुसरे काही आले नाही. अनेक फेकू व चमकु आश्वासनांनी जनतेला भूलथापांशिवाय पदरी काही पडले नाही. या जनविरोधी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. हा रोष विविध मार्गाने बाहेर पडत आहे. या अनुषंगाने  सरकारच्या नाकर्तेपणावर  परळीत राष्ट्रवादी काँग्रेसने  होर्डिंग्जद्वारे हल्लाबोल चढवला आहे. या द्वारे सामान्यांच्या मनातले संतप्त  सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

सरकारच्या नाकर्तेपणाचा वेळोवेळी सातत्याने सभागृहात आणि सभागृहाबाहेर भांडाफोड करत सर्वस्तरातील घटकांचा सरकार विरुद्धचा रोष व आवाज बुलंद करण्याची भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी घेतलेली आहे. या भुमिकेचा प्रभाव राषविश्वासदी काँग्रेस व नागरिकांत मोठा असून परळीत या अनुषंगाने सरकारच्या चार वर्षे पूर्ण कालावधीत जन विरोधी धोरणांमुळे सामान्य नागरिकांच्या मनातील सरकारविरुद्धची एकप्रकारे चीड या होर्डिंग्जद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

उपस्थित करण्यात आलेले प्रश्न –

  1. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला काय?
  2. अन्नदात्याच्या शेतमालाला हमीभाव दिला गेला का ?
  3. बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या काय?
  4. आमच्या मराठा,धनगर,मुस्लीम बांधवांना आरक्षण मिळाले काय?
  5. महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला काय?
  6. महाराष्ट्र्र टोलमुक्त झाला काय?
  7. जीवनावश्यक वस्तु स्वस्त झाल्या की महागल्या?
  8. पेट्रोल,गॅस सिलेंडर स्वस्त झाल की महाग?
  9. जलयुक्त च्या कामांनी भुजल पातळी वाढली की घटली?
  10. अवघ्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे स्मारकाचे कार्य सुरु होण्यास विलंब का?
  11. महाराष्ट्रातील नोकरदार, व्यापारी, गृहिणी विद्यार्थी,लघु उद्योजक सगळेच नाखुष मग सरकार चालतय कुणाचे समाधान करण्यासाठी?

राष्ट्रवादी काँग्रेस परळी च्या वतीने नाकर्त्या आणि असंवेदनशील सरकारचा जाहीर निषेध या होर्डिंग्जद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.

“सामान्य जनतेला पडलेले भाबडे प्रश्न” या टॅगलाईनने विविध संतप्त सवाल उपस्थित करून अतिशय खुमासदार पद्धतीने व वास्तविक व्यंगचित्रातून सरकारला सवाल करण्यात आले आहेत. शहरात ठिक ठिकाणी ठळकपणे लावण्यात आलेले होर्डिंग्ज लक्षवेधी ठरत आहेत.

सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे सामान्य नागरिकांच्या मनातील सरकारविरुद्धची एकप्रकारे चीड आम्ही होर्डिंग्जद्वारे रस्त्यावर व्यक्त करत आहेत.विरोधीपक्ष म्हणून जनतेचा आवाज बननण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेत सरकार विरुद्ध असलेला रोष नक्की येत्या काळात सत्तेत परिवर्तन घडवून आणेल हा विश्वास आहे.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited