Connect with us

विदेश

पद्मश्री शीतल महाजन यांना इजिप्तमध्ये सुवर्णपदक पुरस्कार

Published

on

https://youtu.be/UatBOx2WaHk

मुंबई पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारताच्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन ऑफ आरोनॉटिकल इंटरनॅशनल (एफएआय)या संस्थेच्या वतीने इजिप्त येथे आंतराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुवर्ण पदक देवून गुरुवारी सन्मानित ण्यात आले आहे.

फेडरेशन ऑफ आरोनॉटिकल इंटरनॅशनल ही संस्था जागतिक स्तरावर आकाशातील सर्व खेळाचे नियमन करणारी शिखर संस्था आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वत्तम कामगिरी करणाऱ्या जगभरातील 15 जणांना पुरस्कार देवून ती दरवर्षी सन्मानित करते. शीतल महजान हिला यंदाचा वर्षी एका वर्षात सहा खंडात स्काय डायविंग केल्याबद्दल सबिहा गोकसन गोल्ड मेडल पुरस्काररासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शीतल ही एफएआयचा पुरस्कार स्वीकारणारी पहिली भारतीय महिला आहे. तसेच एका वर्षात जगातील सहा खंडात स्काय डायविंग करणारी ती प्रथम महिला असून हा तिचा सहावा जागतिक विक्रम आहे.

यापूर्वी भारतातील जे.डी.आर टाटा (१९८४)यांना द एफएआय गोल्ड एअर मेडल,एफएआय ब्रॉंझ मेडल अतुल देव (१९९६), द पॉल तिसदीर डिप्लोमा पुरस्कार विश्वबंधु गुप्ता (१९८५), कॅप्टन सतीश शर्मा(१९८५), एफ.एच.इराणी (१९५८), आर.के.वासन (१९८९), द एफएआय एअर स्पोर्ट मेडल पुरस्कार अतुल देव (१९९४) आणि द मंगोलफिर बल्लूनिंग डिप्लोमा पुरस्कार विजयपत सिंघनिया (२००६) या आठ भारतीयांना एफएआय पुरस्काराने गौरविण्यात आले असून प्रथमच महिला भारतीय खेळाडूस या पुरस्काराने जागतिक पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे.

एफएआय ही ऑलिम्पिकशी संलग्न संस्था असून वर्ल्ड ऐरो-स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा आणि जागतिक स्कायडायविंग स्पर्धा यांचे आयोजन ती करते. त्याचसोबत पराग्लायडिंग आणि हॉट एअर बलून व अशाप्रकारचे 14 ऐरो क्रीडाप्रकारांचे संयोजन करते.

शीतल ही मूळ जळगावची रहीवाशी असून सध्या पुणे येथे असते , प्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची ती नात आहे.

Advertisement 585857
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विदेश

विमान अपघात: 189 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळ

Published

on

By

जकार्ता – इंडोनेशियात 189 जणांना घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले आहे. या अपघातात कुणीही जिवंत वाचल्याची चिन्हे नाहीत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लायन एअरचे विमान जकार्ता येथून पांकल पिनांग शहराच्या दिशेने सोमवारी सकाळी निघाले होते. परंतु, अवघ्या 13 मिनिटांतच विमानाचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. यानंतर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त मिळाले. या विमानात 181 प्रवाशांसह क्रू मेंबर्स, पायलट असे एकूण 189 जण प्रवास करत होते. सोबत त्यामध्ये इंडोनेशियाच्या 20 अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited