Connect with us

क्राईम

पती नामर्द निघाला, म्हणून सासरा अन् दिरानेच केला अत्याचार

Published

on

अहमदाबाद – नुकतीच लग्न होऊन सासरी नांदायला आलेली मुलगी मोठ्या अपेक्षेने घरात वावरत असते. ती निर्धास्त असते आपल्या सग्यासोयऱ्यांमध्ये संरक्षण आहे म्हणून. परंतु कधी-कधी हेच कुंपण शेत खायला उठते. पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना नवीन नाहीत, अशीच एक घटना अहमदाबादेतील सरदारनगरमध्ये एप्रिल महिन्यात उजेडात आली होती. येथे पोलिस स्टेशनमध्ये एका सुनेने आपल्या सासऱ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली. पीडिता म्हणाली की, पती नामर्द आहे. यामुळे वंश पुढे नेण्यासाठी सासरा व दीर माझ्यावर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकत आहेत. माझ्या सासूसोबत मिळून सासरा व दीर माझ्यावर अत्याचार करत आहेत. दुसरीकडे, पतीला सांगितल्यावर तो बदनामी होईल म्हणून गप्प राहा म्हणतो, स्वत:च आत्महत्येची धमकी देतो. 
सुनेने आरोप केला की, लग्नाच्या 4 वर्षांनंतरही त्यांना काही अपत्य न झाल्याने सासऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. सासरा व दीर दोघांनी मिळून बळजबरी करत झटापटीत माझ्या हाताचे एक बोटही कापले. एकदा तर दीर व सासरा शेजाऱ्याला घेऊनच माझ्या रूममध्ये घुसले होते. सगळे जण माझे हात-पाय बांधून जबरदस्ती करत होते. त्यांनी माझे केसही कापले. या कामात माझी सासूही त्यांना साथ देत होती. सासू मला किन्नर म्हणते. आता ते माझ्या आईला जिवे मारण्याची धमकी देत आहेत. पतीला सांगितले, तर तो बदनामी होईल म्हणून गप्प राहा म्हणतो, आत्महत्या करण्याची धमकी देतो. मी काय करू काहीच कळत नाही. सततचे हे अत्याचार सहन न होऊन अखेर मी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला.

Advertisement 585857
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

क्राईम

प्रेम प्रकरणाच्या आरोपाने व्यथित झालेल्या साधूने छाटले स्वतःचे गुप्तांग

Published

on

By

कानपुर : प्रेम प्रकरणाचा आरोप झाल्याने व्यथित झालेल्या एका साधूने आपले गुप्तांग छाटल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बंदा जिल्ह्यात शुक्रवारी घडली. गंभीर जखमी झालेल्या साधूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस उप अधीक्षक राघवेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानी बाबा असे त्या साधूचे नाव आहे.  गेल्या काही वर्षांपासून तो वनविभागाच्या जागेवर उभारलेल्या आश्रमात राहत होता. नवरात्रीत मैदानी बाबाने ९ दिवस उपवास केले होते. एका स्थानिक महिलेशी प्रेम प्रकरण असल्याचा आरोप झाल्याने बाबा व्यथित होता.
गुप्तांग छाटल्यानंतर दिलेल्या जबानीत, बाबाने या कृत्यासाठी दोन व्यक्तींना जबाबदार धरले आहे. त्या महिलेशी नाव जोडून हे दोघे माझी बदनामी करीत होते, असा दावा या बाबाने केला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी काही भाविक बाबाच्या आश्रमात गेले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. भाविकांनी याची कल्पना पोलिसांना दिली.  नंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या गुप्तांगाचा ८० टक्के भाग कापला गेला असून, बाबावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited