Connect with us

लेख

गरीबी कोणाला दिसतंच नाही?

Published

on

आज भारतातच नव्हे, तर सबंध जगभरात कित्येक कुटुंबं गरीबीशी झगडताना दिसत आहेत आणि हे विदारक सत्य आपण पाहतो आहोतच; पण यांच्याकडे का दुर्लक्ष होतंय हा मात्र एक गहन प्रश्न आहे, ना याचं ‘उत्तर’ माझ्याकडे आहे, ना तुमच्याकडे नाही सरकारकडेही?

देशाभरात सरकारने गरिबांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या खऱ्या, मात्र याचा लाभ कोण घेतला?, हे देवचं जाणे! आज जगभरातील कयिक कुटुंबं अशी आहेत, जी अन्न- पाण्यावाचून मारताना दिसत आहेत, हे ही तितकंच सत्य आहे. हे आपण कदापि नाकारू शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून मी पाहतोय की आपण अजूनही विकसनशील राष्ट्र म्हणून घेत आहोत आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो; पण आजपर्यंत आपण याचा कधीच विचार केला नाही की आपण कधी ‘विकसित राष्ट्र’ होणार? हे विकसित राष्ट्र न झाल्याने आपण केवळ राजकारण्यांकडे ‘रि’ ओढतो, यात आपण ही तितकेच दोषी आहोत, कारण आपल्या लोकप्रतिनिधीला कोणत्याही कामाचा जाब विचारला नाही, नाही कोणत्या कामासाठी किती निधी उपलब्ध झाला हे ही नाही विचारलं, मग राजकारणीचं कसं दोषी ठरू शकतात, हे देखील महत्वाचं आहे. भारतातली गरिबी अजूनही का हटली नाही, याला केवळ मी एकाचं कोणत्या राजकीय पक्षाला दोषी ठरवणार नाही, आणि मी असही म्हणणार नाही की त्यांनी देशासाठी प्रामाणिक काम केलं नाही, त्यामुळे प्रत्येक राजकिय नेता हा धूर्तच नसतो, त्यालाही कदाचित; जाणीव असेलंच देशाचा विकास प्रगतीपथावर नेण्याची…

मागील काही वर्षात इतर राष्ट्रांच्या तुलनेत निश्चित प्रगतीपथावर आहोत, हे मात्र कदापि नाकारून चालणार नाही; हे जरी खरं असलं तरी सद्या भ्रष्टाचारी बोकाळलेली पाहायला मिळत आहे, गरिबांच्या विविध योजनांचा पैसा आपल्याच घशात कसा येतो यासाठी प्रयत्न सुरू आहेत, हे दुर्दैव आहे. आज मोल मजुरी करून कयिक कुटुंबं आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. यांना ना कोणत्या सरकारी योजनांची कल्पना आहे, नाही आपल्याला निधी मिळतो हे ही ठाऊक नाही? त्यामुळे त्यांचा गरीबीचा हा ‘प्रवास’ असाच सुरू आहे निरंतर.

हे देशातलं विदारक चित्र संपवाचं असेल तर लोकप्रतिनिधीनी ‘माणूस’ म्हणून देशातील जनतेसाठी प्रामाणिक कार्य केलं पाहिजेत, तेव्हा कुठे गरिबीचा हा निकष नाहीसा होईल, अन्यथा हा आलेख वाढच जाईल, यात तीळ मात्र शंका नाही! आपण कितीवेळा ‘लोकसंख्या’ वाढत चालली आहे म्हणून देशाच्या विकासाला जायबंद करणार आहोत, योग्य नियोजन असेल तर कोणतेही राष्ट्र विकासापासून वंचित राहू शकत नाही, त्यामुळे आणखी थोडे प्रयत्न करायला काय हरकत आहे, देशाच्या विकासाठी आणि प्रगतीसाठी.. नाही का?

©बाळकृष्ण अ. मधाळे

Advertisement 585857
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कविता

आज ती त्या बाकावर नव्हती | भाग दुसरा

Published

on

त्या रात्री अचानक रडू लागली ती.ती त्याला भिऊ लागली.तिनं त्याला सारं काही सांगण्याचा प्रयत्न केला.त्यानं ही ऐकून घेतलं.बोलण्यातून गैरसमज झाला.आणि त्याचा राग अनावर झाला.त्याने तिच्यावर हात उचलला.डोक्यात थैमान सुरू झालं.तो काहीच बघेना. तो काहीच विचारे ना.त्याला फक्त त्याच्यावर विश्वास हवा होता.अविश्वासाचा पारा चढू लागला.प्रेम,आदर आणि संस्कार सगळं काही विसरून गेला तो.कारण कुठं तरी सर्व शेवटच्या टोकाला गेलं होतं.काही दिवस झाले असतील.ते असेच गेले होते फिरायला.ती त्याच्या समोर बसली होती.तिनं त्याला आणि त्यानं तिला आयुष्याची गणितं सांगितली होती.आयुष्याचं ध्येय सांगितलं होतं.आता तेव्हा दिलेला हात तसाच हातात ठेवून त्यांना जगायचं होतं. ते जगणार ही होते.प्रेम हे त्या परिघातील विश्वासाच्या केंद्राभोवती फिरत असतं. परिघाचा केंद्र बिंदू कुठं तरी अंधुक व्हायला लागला की त्या केंद्रबिंदू सोबत असणारे सारे धागे पुसटसे वाटू लागतात.आणि शेवटी तो धागा तोडावा या निष्कर्षापर्यंत ते नातं येऊन उभं राहिलं.आणि झालं ही तेच.जे होणार होतं. असंख्य आठवणी घेऊन जगणार आहेत का ते दोघे? की त्यांना कायम आठवत राहतील त्यांच्या झालेल्या चुका? कोण चुकलं? हे च प्रश्न सतावत राहतील की? चुका का झाल्या याचा ही विचार होईल? सारेच प्रश्न समोर येऊन उभेच राहिले होते.तिच्या स्व चा विचार आणि तिचा स्वाभिमान घेऊन तिनं जगायचं होतं हे कुठंतरी त्याला मान्य असावं पण त्यानं तसं कधी सांगितलं नाही.तिनं ही त्याच्यावर केलेलं प्रेम त्याच्या चुका सहित स्वीकारलं नाही.नातं तुटलं याची कारणे देऊन इथं कुणासमोर कुणालाच जिंकायचं नाही.दुबळ्या स्वार्थाच्या चांगुलपणाच्या नात्यापेक्षा जसे आहे त्या असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडावं आणि त्याला स्वीकारावं.अशा मानसिकतेत असावा तो .आणि त्याची ही मानसिकता तिला कधी कळाली नसेलही.वेव्ह लेंथ जुळावी म्हणतात माणसांची.तर ते नातं खुलत जात असतं. इथं वेव्ह लेंथ ही जुळत होती,प्रेम ही होतं. मग का झाला शेवट असा? आणि मुळात शेवट आहे का हा? नसेलच शेवट.मी बसलोय त्या कॉफी समोर.आतून वाफा येतातच आहेत.माझ्या समोर ही रिकामं आहे बाकडं.मला दिसू लागलीये तिची आकृती तिथे.त्या रात्री तिच्या स्वाभिमानाचा चक्काचूर आणि त्याच्या संयमाचा अंत झाला.एका नात्याचा अंत झाला.मुळात ते प्रेमात कसे पडले होते?
कसे आले जवळ? काय झालं होतं?
क्रमशः
फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल.
वाचूयात पुढच्या भागात

Continue Reading

कविता

आज ती त्या बाकावर नव्हती | भाग पहिला

Published

on

तो बसला होता एकटाच आज. जेव्हा जेव्हा भेटायचा तेव्हा समोर असायची ती. हातात हात घेऊन बघायचे डोळ्यात एकमेकांच्या. हरवून जायचे एकमेकांच्यात. कधी कधी त्याला आणि तिला ही वाटायचं. शेजारी शेजारी बसावं. तरीही समोर बसायचे येऊन. तो कोणत्या तरी कॅफे चा टेबल आणि बाक. दोघांनाही हरवून टाकायच्या. कुणाच्या आवडीचं काय आहे या कडे दोघांचंही दुर्लक्ष. तो वेटर दादा सारखा काय येतो. मला तुला घास भरवायचा आहे. आणि जगाची नजर चुकवून काही घास तसेच चारले होते तिने. त्याच्या आवडीचं मागवायची. तो जरा हट्टी होता. तो त्याच्याच दुनियेत वावरणारा. आता आज एकटाच बसलाय त्या बाकावर. आयुष्याचं गाणं गाताना दोघांचे सूर मिसळतील आशा अनेक आणाभाका घेऊन झाल्या होत्या. तो आता राग राग करू लागला होता. त्याने तिच्यावर हाथ ही उचलला. तो तिला मारू लागला,तो तिला बोलू लागला. अगतिक झाला आज आणि भटकू लागलाय एकट्याने. त्याच रस्त्याने. ज्या रस्त्यावर कधी तरी दोघे त्याच गाडीवर मिठी मारून बसले असतील. तिथून निघून चाललाय तो एकट्याच वाटेने. त्यानं मागितली होती वेळ, त्यानं मागितला होता विश्वास. या खोट्याच्या जगात या खोत्यांसारख वागायचा तो ही करीत होता प्रयत्न. कारण त्याला कधी खोट जमलंच नाही वागणं. जे आलं मनात ते बोलून दाखवू लागला. तो असाच होता. त्याचं चुकतंय हे त्याला माहिती होतं. तरी तो तसा वागत होता. आज बसलाय एकटा त्या बाकावर. त्याला भास होत असतील का? ती आहे च इथे. आता घास भरवेल. अरे बाळा, कसं खायचं हे ही तीच शिकवेल. त्याची इच्छा आहे तसा काही तरी व्हावं. पण? पुरुषसत्ताक मानसिकता घालवायची इतकी सोपी नाही. तो बदलेल. कारण तो मनातून पुरुषसत्ताक कधी न्हवताच. आता तो काहीतरी गुणगुणत बसलाय. मी जवळ गेलो तरी अंगावर आला धावून. त्याचा फोन मला अस्पष्ट दिसला. तो तिच्यावर केलेली कविता म्हणत होता. मला शेवटची ओळ कानावर पडली.
पुन्हा भेटू अशाच वळणावर….
काय झालं होतं त्या रात्री? आज तो एकटा का आहे?
वाचा पुढच्या भागात, म्हणजेच भाग क्रमांक 2 मध्ये

Continue Reading

लेख

समाजसेवी बाबा आमटे यांचे जीवनचरीत्र

Published

on

बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.

गरीबांचे दुःख त्यांना असहय व्हायचे. परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे, वयाच्या 14 व्या वर्षी वडीलांनी त्यांना एक बंदुक भेट दिली होती. त्या बंदूकीने बाबा छोटया मोठया जंगली प्राण्यांची शिकार करायचे, जेव्हा ते 18 वर्षाचे झाले त्यांना वडीलांनी एक अॅम्बेसिडर गाडी भेट दिली होती. त्यांना निच्च जातींच्या मूलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नाही. स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायदयाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हां वध्र्यात सेवाग्राम येथे आले होते तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात याचा फार प्रभाव पडला. पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग दर्शवीला.

त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्विकार केला व खादी कपडेच घालायचे ठरविले. अनेक नेत्यांच्या तुरूंगवासा दरम्यान त्यांची कायदयाची बाजू बाबा सांभाळत. गांधीजींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले होते.

त्याकाळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता. अनेक लोक या रोगामुळे बाधीत झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासुनच नाही तर त्याचे कुटूंबही कुष्ठ रोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती, समाजात त्यांना फारच हिन भावनेचा सामना करावा लागत होता.

बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी 15 आॅगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.

1973 साली गडचिरोली जिल्हयातील मदिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला.

बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासुन रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.

त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलनातही सहभाग घेतला. त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानीत केले.

परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदु घुले ज्यांना ते साधना असे म्हणत त्यांनी फार सोबत केली. नेहमी त्या बाबांच्या पाठीशी राहील्या. त्यांचे दोन मुलं आहेत डाॅ. विकास आमटे व डाॅ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या व्यवसायातुन मोलाचा वेळ काढुन बाबांना मदत केली. बाबांच्या दोन्ही सुना डाॅ. मंदाकिनी आणि डाॅ.

भारती हया देखील बाबांच्या कार्यात सहभागी आहेत. डाॅ. प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डाॅ. मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा गावात मदिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हाॅस्पीटल चालवतात.

डाॅ.मंदाकिनी यांनी सरकारी नौकरी सोडून डाॅ. प्रकाश आमटे यांच्या सोबत हेमलकसा येथे स्थायीक झाल्या त्या गोरगरीबांची व जखमी जनावरांची सेवा करतात.

त्यांचे दोन मुले आहेत दिगंत जो डाॅक्टर असुन हेमलकसा येथेच काम करतो दुसरा मुलगा अनिकेत जो एक इंजिनियर आहे ज्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे. 2008 रोजी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना सामाजिक कार्यासाठी मॅगसेसे अवाॅर्ड मिळाला आहे.

बबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हाॅस्पीटल ची जवाबदारी सांभाळतात.

वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हाॅस्पीटल आहे. तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एक अनाथाश्रम आणि अंध व गोर गरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वसंचालीत आनंदवन आश्रमात जवळपास 5000 लोक राहतात.

महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते.

पद्मश्री बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार | Baba Amte Award

 • पद्मश्री पुरस्कार सन् 1971
 • रमण मॅगसेसे पुरस्कार 1985
 • पद्म विभूषण 1986
 • मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार 1988
 • गांधी शांती पुरस्कार 1999
 • राष्ट्रीय भूषण 1978
 • जमनालाल बजाज अवार्ड 1979
 • एन.डी. दीवान अवाॅर्ड 1980
 • रामशास्त्री अवार्ड 1993 ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
 • इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड 1985
 • राजा राममोहन राॅय अवार्ड 1986 दिल्ली सरकार
 • फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड 1987
 • जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड 1987
 • आदिवासी सेवक अवार्ड 1991 भारत सरकार
 • मानव सेवा अवार्ड 1997 यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
 • सारथी अवाॅर्ड 1997 नागपुर
 • महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड 1997 नागपुर
 • कुमार गंधर्व पुरस्कार 1998
 • सावित्रीबाई फुले अवाॅर्ड 1998 भारत सरकार
 • फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर आॅफ काॅमर्स अॅंण्ड इंडस्ट्रिी अवार्ड 1988
 • आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार 1998
 • महाराष्ट्र भुषण अवार्ड 2004 महाराष्ट्र सरकार
 • सन्मानीत पदव्या
 • डी.लिट – टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
 • डी.लिट – 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
 • डी लिट – 1985 – 86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
 • देसिकोत्तमा 1988 – सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, भारत

बाबा आमटे चे सुविचार | Baba Amte Quotes

“मी एक महान नेता बनण्यासाठी काम करीत नाही तर मी गरजु गोरगरीबांची मदत करू ईच्छितो.” – बाबा आमटे

“या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात, असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत.” – बाबा आमटे

बाबा आमटे यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले त्यांची आदिवासींविषयी आदरभाव व उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते त्यांचे कुष्ठरोगींसाठीचे कार्य जागतीक आरोग्य संघटनेव्दाराही प्रशंसीत आहे. संयुक्तराष्ट्राच्या आरोग्य संघटनेत बाबा आमटेंविषयी एक छोटा लघुपट दाखवण्यात आला होता. जी आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र पुत्र असल्यामुळे आपण सर्व महाराष्ट्रीयांसाठी ते प्रेरणेचे सागर आहेत.

Please: आम्हाला आशा आहे की हा “समाजसेवी बाबा आमटे – Baba Amte Biography ला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका…

नोट:  Baba Amte – बाबा आमटे  यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

साभार : माझी मराठी

Continue Reading

लेख

आज तिची खूप आठवण येतेय!

Published

on

I Missed him a lot Today

हल्ली तिला लांबूनच पाहतो, खूप देखणी दिसत आहे ‘ती’ आणि हो, मॉडर्न ही! तिच्यातला साधेपणा काहीसा दूरच झालाय आणि आता एकदम मॉडर्न, फॅन्सी बनलीय. वाटतं तिच्याशी जाऊन बोलावं, तिला काही तरी सांगावं, जुन्या आठवणी काढून खूप-खूप भांडवं, किती जपलं होतं तिने मला हे अगदी तिच्या मिठीत जाऊन सारं काही खोलावं, तिनेही माझी विचारपूस करावी, मीही तिला आपसूक मनातलं सारं काही सांगावं; पण आता तिला काहीच वाटतं नाही माझ्याबद्दल, इतकी बदलीय! गावी गेलो होतो, तेव्हा तिला खूप वेळा बोलावण्याचा प्रयत्न केला; पण ढुंकून ही पाहायला तयार नव्हती ती.

बालपणापासून आम्ही एकमेकांचे जीवलग ‘मित्र’; पण आता सगळं काही विसरून गेलीय, आता तिला काहीच आठवतं नाही पूर्वीचं, इतकी बदलीय ती! मला ही कळतंय आठवीनंतर मी तिला न सांगताच निघून गेलो होतो, तेव्हा खूप चिडली होती माझ्यावर.. पण कधीतरी तिला सोडावं लागणार होतं, हे कदाचित; तिला ठाऊक असावं; पण बिचारी त्यावेळी खूप हिरमुसली होती.

रडून-रडून केवढे डोळे लाल केले होते तिने, माझा हात सोडतंच नव्हती ती; पण नाईलाजास्तव माझा हात तिच्या हातातून सोडवून घ्यावा लागला, कारण मला खूप पुढे जायचं होतं, मला माझं ‘आयुष्य’ घडवायचं होतं, म्हणून! आठवीनंतर तिची-माझी भेट कधीच झाली नाही, आणि तिने कधी होऊ ही दिली नाही. कधी गावी गेलो तर पाहतो तिला; पण ती पूर्वीची माझी शाळा राहिली नाही! कारण, खूप बदल झालाय तिच्यात, तिच्या वागण्यात..मला कधीच विसरून गेलीय ती नव्या जगात (खासगीकरण)! याचं खासगीकरणान तिला ‘मॉडर्न’ बनवलंय, ती आता आपली मातृभाषा विसरून फाडफाड ‘इंग्लिश’ बोलालयला लागलीय, हे बोलायला हवंच, कारण आपल्याला जगासोबत जायचं आहे म्हणून; पण तिला ही का कळतं नाही? पूर्वीही ती इंग्लिश भाषा किती एक्स्पर्ट बोलायची, आता आपलं खासगीकरण झालं म्हणून मातृभाषा विसरून इंग्लिश!

राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत, कारण त्या अजून ‘मॉडर्न’ झाल्या नाहीत ना म्हणून! आणि पालकांनाही आता जुनी शाळा नकोच वाटतेय, का तर तिथे शिक्षक चांगलं शिकवत नाहीत म्हणून, आणि हो, जिल्हा परिषदेच्या शाळेत डोनेशन जास्त नाही ना, त्यामुळे तिथं खरंच चांगलं शिकवत नाहीत, कितीही हा आपला गैरसमज! मित्रांनो, प्रत्येक शाळाही चांगलीच असते, आपण तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे, तसेच खासगीकरणाच्या या जगात आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला विसरता कामा नये, इतकंच! आपल्याला जिने घडवलं तिलाच आपण विसरत चाललोय, का तर तिथं चांगलं शिकवत नाहीत म्हणून, हाच प्रश्न स्वतःला विचारून बघा? कारण, तुम्ही तिथेच शिकलाय आणि मोठं झालाय…

आज जिल्हा परिषद शाळा ओस पडतायत ना याला आपणच जबाबदार आहोत! मित्रांनो, तिला वाचवण्यासाठी एकदा प्रयत्न जरूर करा, कारण ते आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणूनच तिची खूप आठवण येतेय आणि काळजीही वाटतेय!

©बाळकृष्ण अ. मधाळे

Continue Reading

लेख

पत्रास कारण की… विसरून गेलोय!

Published

on

The reason for the letter ... forgotten!

सध्या सोशल जमाना इतका झपाट्यानं वाढतोय की, आपण ‘पत्र लेखन’चं विसरून गेलोय, ते साहजिकच होत, कारण आपण 21 व्या शतकात जगतोय म्हणून; पण आपल्यातील संवाद यामुळे खूपच मंदावलेला दिसतोय, हे मात्र आपण विसरूनच गेलोय! फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर, इन्ट्राग्राम अशी बरीच सोशल माध्यम आपल्या भोवती गराडा घालून उभी आहेत, त्या माध्यमांतून आपण इतके जवळ आलो की, जगणं सुद्धा आपण विसरून गेलो, हां मी मुद्दाम ‘जगणं’ म्हणतोय!

पूर्वीसारखा आपला संवाद होत नाहीय, नाही की पूर्ण बोलणं, होतं बोलणं तेही आता लिमिटेड. पूर्वी पत्राची उत्सुकता असायची, आतुरता असायची.. काय लिहिलं असेल त्यात, कोणता मजकूर आपल्यासाठी असेल, माझ्यासाठी कोणतं गिफ्ट असेल त्यात, असे बरेच प्रश्न ‘पत्र’ पोहोचेपर्यंत आपल्याला पडायचे. ताई कशी आहे, आई-बाबा कसे आहेत, दादा आता काय करतोय? आणि आजी-आजोबांची तब्येत बारी आहे ना?, आणि ते शेजारचे काका-काकी बोलतात का गं आपल्याशी? ऐक ना, दीदीच बाळ कसं आहे गं? आणि ते आपलं वासरु विकलं? दादू पास झाला का गं पहिली? अशी किंबहुना बरीच प्रश्न या माध्यमांमुळे अनोत्तरीतच आहेत! का तर आता पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाही.

तिर्थस्वरूप सा. न. वि. वि, प्रिय, प. पूज्य गुरुवर्य, शि. सा. न. वि. वि., महोदय असे बरेच शब्द आपल्यापासून कोसोदूर फेकले गेले आहेत. या शब्दांचा क्वचितच वापर आपल्याला पाहायला मिळतोय, याच त्या सध्याच्या सोशल जमान्यात! आपल्यातील संवाद खरंच खुंटत चाललाय, मी म्हणत नाही की, या माध्यमांचा आपल्याला कोणताही फायदा नाही, खूप फायदा आहे; पण संवाद होणे देखील तितकंच गरजेचं आहे. पोस्टाचा तो ‘लाल डबा’ खरंच चष्मा असून देखील दिसत नाही, कारण आपण आता खूपच आंधळे झालो आहोत आणि या धावपळीच्या जमान्यात पत्र लिहिण्याची आपण कोणतीही तसदी घेत नाही, कारण कळतं सगळं आपल्याला त्या ‘मोबाईल’वर खुशी-खुशाली! त्या जमान्यातला ‘कबुतर’ पण आपण कधीच विसरलोय, प्रेमीकेसाठी, राजा-महाराजांसाठी तो ‘पत्र’ पोहोचवायचा.

आता पूर्वीसारखी आई-बाबांची खुशाली कळतं नाही आणि मोबाईल असूनही आता बोलणं होत नाही, का तर पोरगं आता कामाला लागलंय, चार पैसे कमवायला लागलंय, त्यालाही कामातून वेळ नसेल कदाचित; आपल्यासोबत बोलायला, पत्र लिहावं म्हंटल तरी तो आता ‘साक्षर’ असून वाचणार नाही, अशा बऱ्याच पालकांची हीच अवस्था आहे. मित्रांनो, आपल्या जगण्यातून थोडा वेळ द्या पालकांसाठी, मोबाईलवर बोलणं होतंच रे, कधीतरी पत्रातून खुशाली कळवा आपल्या आई-बाबांसाठी, आजी-आजोबांना अजूनही आतुरता आहे, जेव्हा शाळेत होतास ना पत्र लेखन करायचास, तेव्हा सर्वात आधी तू आजोबांनाच ते तुझं ‘पत्र’ दाखवायचास, तेव्हा किती खुश व्हायचे ते…

आजही ते तुझ्या पत्राची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत रे.. आणि तुझी ताई, तू शाळेत जायचास ना, तेव्हा तुला अगदी शाळेपर्यंत सोडवायला यायची ती;पण जेव्हा तीच लग्न झालं, तू किती रडला होतास.. आणि तीच खुशाली ताईला तू माहेरी पाठवली होतीस अगदी त्याच जुन्या ‘पत्रा’तून; पण आता तू सगळं काही विसरलायस, आई-बाबा, आजी-आजोबा, ताई, दादा आणि हो त्या ‘पत्रा’लाही, जे तुझी खुशाली तिच्यापर्यंत पोहोचवायचं! बघ, वेळ असेल तर कदाचित; लिहायला सुरू कर, त्याच जुन्या पत्राच्या माध्यमातून तुझ्या गोड आठवणी आई-बाबांना सांगायला सुरू कर, बघ किती खुश होतील ते.. माझ्या पोरानं पत्र पाठवलंय गावभर सांगतील ते.. बघ, वेळ असेल तर..!

©बाळकृष्ण अ. मधाळे

Continue Reading

लेख

हल्ली ‘प्रेम’च बदलत चाललंय!

Published

on

सध्याच्या ‘स्मार्ट’ जगात आता प्रेम ही काहीसं स्मार्टच होताना दिसत आहे, आणि ते असायला हवंच; पण विश्वासाची सोयरीक न सोडता! पूर्वीच्या प्रेमात आणि आताच्या प्रेमात काहीसा फरक जाणवत आहे, कारण पूर्वी स्मार्ट असं काहीच नव्हतं, होता बस्स तोच तिच्यासाठी ‘स्मार्ट’! असो, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! या मंगेश पाडगावकरांच्या काव्य पंक्तीत आताचं ‘प्रेम’ कुठेच दिसत नाही.

पूर्वी एखाद्या मुलीला प्रपोज करायचं म्हंटल ना, तर तीन-तीन, चार-चार वर्षे लागायची तिला आपलं प्रेम समजवायला आणि तिला किमान 2 वर्षे तरी लागायची आपल्याच त्या प्रेमाचा ‘स्वीकार’ करायला; तिला चिट्ठी देऊ की, समोरासमोर प्रेम व्यक्त करू, आणि तिनं घरी माझं नावं सांगितलं तर आणि तिच्याशी बोलताना मला कोणीतरी पाहिलं तर आणि तिने माझं प्रेमचं स्वीकारलं नाही तर, अशा एक नव्हे हजार शंखा त्यावेळी उपस्थित होत होत्या; पण आता तसं काहीच होताना दिसत नाही, कारण आता ‘प्रेम’च स्मार्ट झालंय! सध्या ‘प्रपोज’ची जागा चिट्ठीऐवजी फेसबुक, व्हाट्सएप, इन्ट्राग्राम इत्यादी सोशल माध्यमांनी घेतली, त्यामुळे ‘प्रेम व्यक्त’ करायला आता कोणालाही फारसा वेळ लागत नाही (ती असो, वा तो) आणि तीही आता स्मार्टच बनली आहे, त्यामुळे घरी सांगण्याचा प्रश्नच उदभवत नाही, कारण आता (तिला-त्याला) सगळं समजतं! या माध्यमांनी प्रपोजची जरी जागा घेतली असली तरी मनापासूनचं प्रेम आता व्यक्त होताना दिसत नाही.

पूर्वी तिच्या-त्याच्या एका कटाक्ष नजरेची आस, शाळा सुटल्यातनंतर चुकून झालेला तिच्या हातांचा स्पर्श, मैत्री पलीकडे नव्हतेच प्रेम..तरीही किंचितशी आस कुठेतरी असणं, धाडसाने त्याच्याशी बोलणं.. किती हे मनमोकळं वाटायचं! आणि झालंच प्रेम तर.. तिचं मिश्किल बोलणं नुसतंच आठवत राहायचं, कधी रस्त्याने जाताना दिसली की स्मितच करायचं, तेव्हा तिचा (त्याचा) हातात हात घेऊन भविष्याची स्वप्न रंगवायचं…

इथं मात्र हाताच्या स्पर्शापुढे कोणताच स्पर्श नसायचा, कारण तेव्हा इतकंच प्रेम असायचं; पण ते किती खरं वाटायचं अगदी नवरा-बायको सारखचं! त्यावेळी तिचा-त्याचा (त्याच्या) हातात हात घेतल्या नंतरच्या आणाभाका किती विश्वासाच्या वाटायच्या, तेव्हा ‘त्या’ जोडगळीला प्रेम म्हणजेच ‘विश्व’ वाटायचं; पण आता प्रेमाची व्याख्याचं बदललेली दिसतंय, प्रेम हे ‘वासनांध’ बनलेलं आहे, जे त्याची शाश्वती देत नाही; पण काहींच्या बाबतीत! सध्याच्या स्मार्ट जगात ही विश्वास जपणारी प्रेम प्रकरणे आहेत, जी आजही प्रेमातली आत्मीयता, पवित्रता जपतायत, अगदी मनापासून!

©बाळकृष्ण अ. मधाळे

Continue Reading

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited